टीम इंडियात होतोय दुजाभाव; भारताच्या माजी महान फलंदाजाचे मोठे वक्तव्य  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 23 December 2020

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारतीय संघातील मतभेदाबाबत भाष्य केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारतीय संघातील मतभेदाबाबत भाष्य केले आहे. भारतीय संघातील टी नटराजन आणि आर अश्विन यांना वेगळी वागणूक व संघातील इतर खेळाडूंसाठी वेगळे नियम असल्याचे सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे. सुनील गावस्कर यांनी एका मुलाखती मध्ये बोलताना भारतीय संघात सर्व काही आलबेल नसल्याचे सांगितले आहे. 

AUSvsIND: तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीची ठिकाणं बदलण्याची शक्यता; वाचा काय आहे कारण?

सुनील गावस्कर यांनी मुलाखतीमध्ये भारतीय संघातील काही खेळाडूंसाठी वेगळे नियम व अन्य खेळाडूंसाठी वेगळी वागणूक मिळत असल्याचे सांगितले. भारतीय संघातील फिरकीपटू आर अश्विनच्या गोलंदाजीत कोणतीही कमी नाही. तरी देखील त्याला बरेच दिवस झगडत रहावे लागत असल्याचे सुनील गावस्कर म्हणाले. व याबाबत अधिक बोलताना गावस्कर यांनी, आर अश्विन संघातील बैठकीच्या दरम्यान आपले मत मांडतो. तर इतर खेळाडू सहमत असले किंवा नसले तरी फक्त होकारार्थी माना हलवत असल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच अन्य देशातील संघांमध्ये कसोटीत 350 हून अधिक विकेट्स घेतलेल्या गोलंदाजाला प्रथम प्राधान्य देण्यात येते. व भारतीय संघात आर अश्विनने 350 पेक्षा अधिक कसोटी विकेट्स आणि चार शतक देखील झळकावलेले असल्याचे सुनील गावस्कर यांनी या मुलाखतीत सांगितले. आणि पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनला संधी देण्यात आल्यानंतर जर त्याला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नसती, तर त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात बाहेर बसावे लागले असते. आणि अशी वागणूक संघातील फलंदाजाला देखील दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. एखादा फलंदाज किंवा गोलंदाजाला फ्लॉप झाला तरीही त्यांना पुढची संधी मिळते. मात्र अश्विनसाठी नियम वेगळा असल्याचे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. 

ICC T20 Ranking: विराटची प्रगती; तर न्यूझीलंडचे सेफर्ट व साउदी यांची गरुड झेप

याव्यतिरिक्त, टी नटराजन सोबत देखील असेच काहीसे घडत असल्याचे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. टी नटराजनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणि टी-ट्वेन्टी मालिकेत देखील उत्तम कामगिरी केली आहे. आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या प्ले ऑफ सामन्यांच्या वेळेसच टी नटराजनला पहिल्यांदा अपत्य प्राप्ती झाली होती. मात्र त्याला दुबईतून थेट ऑस्ट्रेलियास जावे लागले. आणि या दौऱ्यातील काही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर देखील त्याला कसोटी सामन्यांमध्ये पर्दापणासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सुनील गावस्कर म्हणाले. इतकेच नाहीतर सध्या टी नटराजनला नेट मधेच गोलंदाजी करावी लागत असून, यावरूनच संघात खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम असल्याचे सुनील गावस्कर यांनी या मुलाखतीत सांगितले आहे.             


​ ​

संबंधित बातम्या