''वेळ आणि स्थानिक नियमांबाबत माहिती नसल्यामुळेच असे घडले'' 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 22 December 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनासह अन्य सेलिब्रेटींना कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल मुंबई पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले होते.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनासह अन्य सेलिब्रेटींना कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल मुंबई पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर सुरेश रैनाला जामीन मिळाला असून, त्याने घडलेल्या गोष्टीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करुन पार्टीत सामील झाल्याबद्दल सुरेश रैनासह काही सेलिब्रेटींवर ही कारवाई झाली होती. यावर सुरेश रैनाने शूटच्या निमित्ताने मुंबईत आल्याचे सांगितले. व यावेळेस रात्री उशीर झाल्यानंतर मित्राकडून क्लब मध्ये जेवणासाठी आमंत्रण देण्यात आल्याचे सुरेश रैनाने म्हटले आहे. 

''कोहली आणि शमीच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला फटका''  

मुंबई विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन प्लाय क्लबमध्ये सुरेश रैनाशिवाय, गायक गुरु रंधवा, सुजैन खान ही मंडळी देखील पार्टीत सहभागी झाली होती. व यावेळी मुंबई पोलिसांनी छापा टाकत 34 जणांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. व या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सुरेश रैनाला जामीन मिळाला असून, या घटनेवर रैनाने निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, एका शूटच्या निमित्ताने सुरेश रैना मुंबईत होता. व यावेळेस मित्राने जेवणासाठी आमंत्रित केल्याचे सुरेश रैनाने म्हटले आहे. तसेच त्यानंतर तो पुन्हा दिल्लीकडे रवाना होणार होता. परंतु यावेळेस वेळ आणि स्थानिक नियमांबाबत माहिती नसल्यामुळे असे घडल्याचे सुरेश रैनाने सांगितले. याव्यतिरिक्त संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या प्रक्रियेचे पालन करत, नकळत घडलेल्या घटनेबद्दल  दिलगिरी व्यक्त केल्याचे सुरेश रैनाने निवेदनात म्हटले आहे. 

''पुढच्या सामन्यांमध्ये देखील टीम इंडियाचे अवघडच''

दरम्यान, भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैनाने 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या संध्येला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती. तर यंदाच्या इंडियन प्रिमीअर लीगच्या (आयपीएल) तेराव्या हंगामात सुरेश रैनाने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती. तर आगामी सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे सुरेश रैनाने जाहीर केले होते.              


​ ​

संबंधित बातम्या