'विराट' मिम्सवर सूर्याचा लाईक-अनलाईक खेळ
विराट-सूर्यकुमार यांच्यात मैदानात झालेल्या कथित वादानंतर काहींनी विराटवर टीकाही केली. पण आता सूर्यकुमार यादव ट्रोल होताना दिसतोय. सूर्यकुमार यादवने विराट कोहलीसंदर्भातील व्हायरल मिम्स लाईक केली होती. या मिम्समधून विराटला ट्रोल करण्यात आले होते. सूर्यकुमारने याला लाईक केल्यानंतर ही मिम्स चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर आता सूर्यकुमार यादवला ट्रोल करण्यात येत आहे. यावरुन सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाल्यानंतर सूर्यकुमारने माघार घेत विराटच्या मिम्सवर दिलेली प्रतिक्रिया अनलाईक केली आहे.
युएईमध्ये रंगलेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडू खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने लक्षवेधी कामगिरी केली. आयपीएलमधील त्याच्या खेळीनं प्रभावित झालेल्या क्रिकेट चाहत्यांनी त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्याला संधी द्यायला हवी होती, अशी भावनाही बोलून दाखवली. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील एका सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्यात आंखो ही आखों मे झालेल्या सायलेंट वॉरमुळे त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगल्याचे पाहायला मिळाले.
शाकिबच्या माफिनाम्यावर कंगनाकडून प्रश्नांचा भडीमार
विराट-सूर्यकुमार यांच्यात मैदानात झालेल्या कथित वादानंतर काहींनी विराटवर टीकाही केली. पण आता सूर्यकुमार यादव ट्रोल होताना दिसतोय. सूर्यकुमार यादवने विराट कोहलीसंदर्भातील व्हायरल मिम्स लाईक केली होती. या मिम्समधून विराटला ट्रोल करण्यात आले होते. सूर्यकुमारने याला लाईक केल्यानंतर ही मिम्स चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर आता सूर्यकुमार यादवला ट्रोल करण्यात येत आहे. यावरुन सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाल्यानंतर सूर्यकुमारने माघार घेत विराटच्या मिम्सवर दिलेली प्रतिक्रिया अनलाईक केली आहे.
धवनमध्ये भाईजान घुसला; डान्सिंग स्टेप एकदा पाहाच (VIDEO)
या कृत्यामुळे तुला भारतीय संघात स्थान मिळणं कठिण होईल, अशा आशयाच्या काही प्रतिक्रिया उमटल्या होत्या.मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या सूर्यकुमारने यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा धमाकेदार खेळ करुन सर्वांचे लक्ष्य वेधण्यात यश मिळवले. मागील दोन-तीन हंगामापासून तो सातत्यपूर्ण चांगली खेळी करत आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची क्षमता असल्याचेही बोलले जात आहे.