Syed Mushtaq Ali 2020 : अझरुद्दीनचा शतकी धमाका; 197 धावा करुनही मुंबई हरली (Video)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 13 January 2021

अझरुद्दीनच्या नाबाद शतकामुळे मुंबईवर पराभवाची नाच्चकी ओढावली.

मुंबईचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने  (yashasvi jaiswal) केरळच्या अनुभवी आणि सातवर्षानंतर दमदार पदार्पण केलेल्या श्रीसंतची धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. सय्यद मुश्‍ताक अली ट्रॉफीत(syed mushtaq ali) बुधवारी मुंबई आणि केरळ यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण निर्धारित 20 षटकात 197 धावा करुनही मुंबईच्या पदरी पराभव आला.  केरळच्या 26 वर्षीय विकेट किपर बॅट्समनने केलेल्या नाबाद शतकामुळे मुंबईवर पराभवाची नाच्चकी ओढावली. केरळने 8 विकेट राखून सामना जिंकला.  

सलामीवीर यशस्‍वी जयस्वाल आणि आदित्‍य तारे यांनी 88 धावांची भागीदारी रचत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. या सामन्यात 19 वर्षीय यशस्वीनं श्रीसंतवर चांगलाच हल्लाबोल केला. त्याच्या 32 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार खेळत त्याने 40 धावा कुटल्या. डावातील 6 व्या षटकात श्रीसंतच्या गोलंदाजीवर यशस्वीने तब्बल 16 धावा लुटल्या. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर यशस्वीच्या बॅटमधून सलग दोन षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर एक खणखणीत चौकरही मारला.  

Syed Mushtaq Ali T20 : सात वर्षानंतरही तेवर कायम; श्रीसंतनं झोकात केलं कमबॅक (VIDEO)

श्रीसंतने 11 जानेवरीला पुडुचेरीच्या विरुद्धच्या सामन्याने क्रिकेटच्या मैदानात तब्बल 7 वर्षांनी कमबॅक केले होते. या सामन्यात त्याने 4 षटकात 29 धावा खर्च करुन एक विकेट घेतली होती. 7 वर्षानंतर त्याने आउट स्विंगवर पहिली विकेट घेतली होती.   मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 बाद 196 धावा केल्या होत्या. हे आव्हान केरळाने 8 गडी आणि 25 चेंडू राखून पार केले. केरळच्या यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनने 54 चेंडूत नाबाद 137 धावांची धमाकेदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 11 षटकार लगावलं. 


​ ​

संबंधित बातम्या