Syed Mushtaq Ali Trophy : कॅप्टन कृणाल पांड्यावर गंभीर आरोप; हुड्डाने संघ सोडला

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

दीपक हु्ड्डाच्या जागी अद्याप कोणत्याही खेळाडूला संघात घेण्यात आलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Syed Mushtaq Ali Trophy controversy : ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या मैदानात प्रेक्षकांकडून भारतीय खेळाडूंना अपमानजनक शब्दांचा मारा झाल्याची घटना घडत असताना घरच्या मैदानात एकमेकांसोबत खेळणाऱ्या आणि भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या गड्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. अनुभवी दीपक हुड्डाने (Deepak Hooda) कर्णधार कृणाल पांड्या (Krunal Pandya) वर गंभीर आरोप केलाय. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण मानली जाणारी सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) साठीच्या शिबिरातून माघार घेतली आहे. त्याने आपले नाव माघारी घेतल्यानंतर बडोदा क्रिकेट असोसिएशनने (BCA) संघ व्यवस्थापनाकडून संबंधित प्रकरणाबद्दल अहवाल मागितला आहे. 

राष्ट्रीय टी20 स्पेर्धेला रविवारपासून सुरुवात झाली. बीसीएचे (बडोदा क्रिकेट असोसिएशन)   सचिव अजीत लेले यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, सर्व खेळाडू जैव सुरक्षित वातावरणात आहेत. दीपक हु्ड्डाच्या जागी अद्याप कोणत्याही खेळाडूला संघात घेण्यात आलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही संघ व्यवस्थापनाच्या अहवालाची प्रतिक्षा करत आहोत. बीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हुड्डा हुड्डा टीम वास्तव्यास असलेल्या हॉटेल सोडून निघून गेला आहे. त्याने प्रथम श्रेणीतील 46 सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने टिम इंडियाचेही प्रतिनिधीत्व केले आहे.  बडोदा संघाचे नेतृत्व करणाऱ्या कृणाल पांड्यावर तो नाराज आहे. कर्णधाराच्या वर्तणुकीला वैतागून त्याने संघाची साथ सोडली आहे.  

वर्णभेदाचा खेळ : ''तुम करो तो सॅरकॅझम, ओर कोई करे तो रेसिझम''

यासंदर्भात हुड्डाने बीसीएला ईमेल पाठवला आहे. सध्याच्या घडीला मी निराश आणि दबावात आहे. माझ्या संघाचा कर्णधार कृणाल पांड्या इतर सहकाऱ्यांसमोर मला अपशब्दाचा वापर करतोय. त्याचे या कॅम्पमध्ये आलेल्या सर्वांसोबतचे वर्तन असेच आहे, असा उल्लेखही त्याने ईमेलमध्ये केलाय. मुख्य प्रशिक्षक प्रभाकर यांच्या परवानगीने नेटमध्ये सराव करत असताना कृणाल पांड्या माझ्याकडे आला. त्याने माझ्यासोबत असभ्य वर्तन केले, असा आरोप दीपक हुड्डाने केलाय. बडोदाचा संघ एलीट ग्रुप सीमध्ये गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांच्यासोबत भिडणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या