नटराजनची सुंदर ड्राइव्ह; आनंद महिंद्रांना दिलं खास रिटर्न गिफ्ट

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 1 April 2021

नटराजन याने सोशल मीडियावर फोटो शेअर करताना म्हटले आहे की, भारतीय संघाकडून क्रिकेट खेळणे आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण होता.

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी वचन पूर्ण करत भारतीय गोलंदाज टी. नटराजन याला Mahindra Thar SUV 2 ही गाडी भेट दिली. नटराजनने गिफ्टमध्ये मिळालेल्या अलिशान गाडीसोबतचे काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. एवढेच नाही शक्तीशाली आणि शानदार लूक असलेली गाडी मिळाल्यानंतर त्याच्या बदल्यात नटराजन याने आनंद महिंद्रा यांना खास रिटर्न गिफ्टही दिले आहे. नटराजन याने गाभा टेस्टमध्ये घातलेली जर्सी आनंद महिंद्रा यांना भेट म्हणून दिली आहे. 

नटराजन याने सोशल मीडियावर फोटो शेअर करताना म्हटले आहे की, भारतीय संघाकडून क्रिकेट खेळणे आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण होता. लोकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे अशक्य गोष्टी शक्य होण्यास मदत झाली. महिंद्रा थारची सुंदर ड्राइव्ह केली. आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या भेटीबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे. क्रिकेट प्रति त्यांना गाबा टेस्टमध्ये घातलेला शर्ट सहीसह भेट दिल्याचा उल्लेख त्याने ट्विटमध्ये केला आहे.  

 2011 चा वर्ल्ड कप जिंकून उपकार केले नाहीत : गौतम गंभीर

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दमदार कामगिरी केली होती. पिंक बॉलवर पहिल्या सामन्यात 36 धावांत ऑल आउट झालेल्या संघाने उर्वरित सामन्यात कमालीचे कमबॅक करत भारतीय संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला होता. या मालिकेत नेट बॉलर म्हणून सोबत असलेल्या टी नटराजन यानेही ऑस्ट्रेलियातील मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला होता. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियातील विजय प्रेरणादायी असल्याचे आनंद महिंद्रांनी म्हटले होते. याशिवाय या दौऱ्यावर लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या टी नटरानशिवाय शुभमन गिल, वाशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी यांना थार कार देण्याचे वचन दिले होते. नटराजनली ही भेट मिळाली आहे.


​ ​

संबंधित बातम्या