हरभजन सिंगकडे पुन्हा 'गुड न्यूज'; शेअर केले स्पेशल फोटो!
हरभजन सिंग-गीता बसरा जोडीला हिनाया नावाची चार वर्षांची एक मुलगी आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला ११ जानेवारीला कन्यात्न झाले. त्यांनी मुलीचे नाव वामिका ठेवले. सोशल मीडियावर अनुष्का आणि विराटवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. महिला दिनानिमित्त विराटने अनुष्का आणि वामिकाचा फोटो शेअर करून महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. वामिकाचं सर्वत्र कौतुक आणि लाड होत असतानाच आता भारताचा आणखी एक क्रिकेटपटू आणि त्याची अभिनेत्री पत्नी आई-बाबा होणार असल्याची बातमी मिळाली. टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग आणि त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसरा यांनी चाहत्यांना एक गोड बातमी दिली. हरभजन सिंग आणि गीता यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून 'गुड न्यूज' दिली.
गीता बसराने आपल्या ट्विटर अकाऊंटवर चार फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये हरभजन, गीता आणि त्यांची मुलगी तिघेही आहेत. अतिशय सुंदर असे चार फोटो तिने शेअर केले आहेत. जुलै २०२१मध्ये आमच्या घरी नवा पाहुणा येणार आहे असं कॅप्शनही तिने दिलं आहे.
Coming soon.. July 2021pic.twitter.com/LmCVs3qIy9
— Geeta Basra (@Geeta_Basra) March 14, 2021
हरभजन आणि गीता यांना हिनाया नावाची मुलगी आहे. हिनाया जुलै २०२०मध्ये चार वर्षांची झाली. तिच्या वाढदिवसानिमित्त हरभजन आणि गीता यांनी एक जंगी पार्टीचे आयोजन केलं होतं. त्या पार्टीमध्ये हिनाया खूपच गोंडस दिसत होती. हरभजनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो पोस्ट केले होते.