पाहावं ते नवलंच... IPL आधी धोनीचा नवा लूक होतोय व्हायरल, पाहा नक्की आहे प्रकरण

सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 14 March 2021

एकेकाळी लांब केस असलेल्या धोनीला अचानक टक्कल कसं काय पडलं असा चर्चा सध्या रंगताना दिसत आहे

भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी नेहमीच चर्चेत असतो. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिआवर व्हायरल होत असतात. पत्नी साक्षीसोबतचे रोमँटिक व्हिडीओ असो वा मुलगी जीवासोबतचे धमाल-मस्ती करतानाचे व्हिडीओ असोत, त्याच्या प्रत्येक व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच धोनीचा एक एक हटके व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धोनीचा नवा लूक बघायला मिळत असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

धोनी सध्या चेन्नईमध्ये असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ची तयारी करत आहे. ९ एप्रिलपासून आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या माजी कर्णधाराचा नवा लूक व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये धोनी, "क्या है इस अवतार के पिछे का मंत्रा, जल्द ही आपको पता चलेगा...", असं म्हणताना दिसतो आहे. 'स्टार स्पोर्ट्स'च्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्याला झकास कॅप्शनदेखील देण्यात आलं आहे. 'मंत्र… अवतार… आम्ही सुध्दा तुमच्यासारखेच बुचकळ्यात पडलो आहोत. धोनी ज्याबद्दल बोलतोय तो मंत्रा नक्की काय आहे याबद्दल तुम्हाला काही अंदाज येत असेल तर आम्हाला त्याबद्दल नक्की सांगा आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत रहा", असं कॅप्शन देत क्रीडा वाहिनीने एक जाहिरात ट्विटरवर शेअर केली आहे.

'कॅप्टन कूल' धोनीने हा नवा लूक खास 'आयपील'च्या १४व्या हंगामा संदर्भातील जाहिरातीसाठी केला आहे असं म्हटलं जात आहे. धोनीच्या हेअरस्टाईलचे अनेक चाहते आहेत. पण या पोस्टमध्ये धोनीचं टक्कल पाहून त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. धोनीहा बौद्ध भिक्खूसारखा वेष करून या जाहिरातीत डायलॉग्स बोलताना दिसतो आहे. या जाहिरातीमुळे आता धोनीच्या टक्कल पडण्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी सारेच चाहते उत्सुक आहेत. त्याचसोबतच सारे क्रिकेटरसिक IPL 2021ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चेन्नई सुपर किंग्स १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्ससोबत आपला पहिला सामना खेळणार आहे. या हंगामातदेखील महेंद्रसिंग धोनी हाच संघाचे नेतृत्व करणार असून संघाला स्पर्धेत नवी आणि भक्कम सुरूवात मिळवून देण्याचं आव्हान त्याला पेलावं लागणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या