INDvsAUS : टीम इंडियाची चिंता वाढली; रोहित आणि इशांत खेळण्याची शक्यता कमी    

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रोहित शर्मा आणि आघाडीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भाग घेऊ शकणार नसल्याची माहिती मिळत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रोहित शर्मा आणि आघाडीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भाग घेऊ शकणार नसल्याची माहिती मिळत आहे. मिळलेल्या वृत्तानुसार, रोहित आणि इशांत हे दोघेही दुखापतीतून सावरू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

INDvsAUS : धवनने शेअर केला खास फोटो ; असा असेल टीम इंडियाचा नवा लूक 

रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा यांच्यावर सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रिया सुरू आहे. आयपीएल 2020 च्या उत्तरार्धात रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. तर फक्त एक सामना खेळल्यानंतर इशांत शर्मालाही दुखापत झाली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. आणि हे दोन्ही खेळाडू 27 नोव्हेंबरपर्यंत तेथे पोहोचले नाहीत तर त्यांच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.

याशिवाय कोरोनाच्या कारणामुळे ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर त्यांना 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी घालवावा लागणार आहे. तसेच एनसीएमधून मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा यांच्याबाबत बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटला सांगण्यात आल्याचे समजते. परंतु अद्याप मंडळाकडून याबाबत अधिकृत निवेदन आलेले नाही. 

INDvsAUS : सूर्यकुमारला टीम इंडियात स्थान द्यायला हवे होते

दरम्यान, यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याबद्दल  शंका व्यक्त केली होती. रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीत यासंदर्भात बोलताना, रोहित आणि इशांतला ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेत खेळण्यासाठी तंदरुस्त होऊन येत्या तीन ते चार दिवसात ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. शिवाय जर असे नाही झाले तर त्याचे या दौऱ्यात खेळणे फारच कठीण होणार असल्याचे मत रवी शास्त्री यांनी मुलाखतीत सांगितले होते.     


​ ​

संबंधित बातम्या