ICC T20 Rankings : लोकेश राहुल पडतोय विराटवर भारी; आघाडीच्या 5 मध्ये भारताचा एकमेव फलंदाज

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-ट्वेन्टी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-ट्वेन्टी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या टी-ट्वेन्टीतील फलंदाजांच्या यादीत या दोन्ही खेळाडूंनी आपल्या रँकिंग मध्ये सुधारणा केली आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार  केएल राहुलचे एक स्थान सुधारून तो आता तिसर्‍या स्थानावर पोहचला आहे. तर विराट कोहलीने देखील आठवे स्थान मिळवले आहे.

AUSvsIND : कोहलीचा ऑस्ट्रेलियात डंका; नावावर झाले 'विराट' रेकॉर्डस्   

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात विराट कोहलीने धडाकेबाज कामगिरी करत अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी-ट्वेन्टी फलंदाजांच्या यादीत नवव्या क्रमांकावरून आठव्या स्थानावर पोहचला आहे. तर पहिल्या सामन्यात 51 धावांची खेळी करणाऱ्या केएल राहुलने चौथ्या नंबरवरून तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. 

विराट म्हणाला, अन्यथा हार्दिकचे स्थान कसोटी संघात नसणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत इंग्लंड संघाचा डेव्हिड मलान 915 अंकांसह टी-ट्वेन्टी फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यानंतर पाकिस्तान संघाचा बाबर आझम 871 अंकांसह दुसऱ्या स्थानी असून, केएल राहुल आता 816 गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाचा ऍरॉन फिंच 808 अंकांसह तिसऱ्या स्थानावरून आता चौथ्या स्थानी आला आहे. व दक्षिण आफ्रिकेचा रॉसी वॅनडर डुसेन 744 गुणांसह पाचव्या स्थानी कायम आहे. आणि विराट कोहली 697 अंकांसह आठव्या स्थानी पोहचला आहे.          


​ ​

संबंधित बातम्या