न्यूझीलंड आणि इंडीज यांच्यातील तिसरा टी20 सामना रद्द; न्यूझीलंडचा मालिका विजय   

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळवण्यात येत होता.

न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळवण्यात येत होता. मात्र पावसाचा व्यत्यय आल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. व त्यामुळे यजमान न्यूझीलंडच्या संघाने टी20 सामन्यांची मालिका आपल्या खिशात घातली आहे. न्यूझीलंडच्या संघाने यापूर्वीच्या दोन सामन्यात विजय मिळवला होता. 

विराटची कॅप्टन्सी समजण्यापलीकडे; गौतम गंभीरची टीका

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभूत केले. त्यानंतर आता या दोन्ही संघात दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. कसोटी मालिका 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज यांच्यातील तिसरा टी20 सामना  बे ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात येत होता. या सामन्यात केवळ 2.2 षटकांचाच खेळ होऊ शकला.  वेस्ट इंडीजच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना एक गडी गमावत 25 धावा केल्या होत्या. आणि त्यानंतर पाऊस सुरु झाला. 

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन टी20 सामन्यांची मालिका केवळ चार दिवसात खेळवण्यात आली. पहिल्या सामन्यात किवीच्या संघाने वेस्ट इंडीजचा पाच गडी राखून पराभव केला होता, तर दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंडने ग्लेन फिलिप्सच्या शतकाच्या जोरावर 72 धावांनी वेस्ट  इंडीजवर विजय मिळवला होता. या मालिकेच्या तिन्ही सामन्यात चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने प्लेयर ऑफ द सीरिजचे विजेतेपद पटकावले. फर्ग्युसनने तीन सामन्यांत 7 गडी बाद केले.  


​ ​

संबंधित बातम्या