परेरा ठरला नववा षटकार किंग; पाहा 1 ओव्हरमध्ये 6 सिक्स खेचणाऱ्या फलंदाजांची यादी
यात त्याने 8 उत्तुंग षटकार ठोकले. विशेष म्हणजे 52 धावांपैकी 48 धावा त्याने बाउंड्रीच्या स्वरुपात काढल्या.
श्रीलंकच्या थिसारा परेराने (Thisara Perera) क्रिकेटच्या मैदानात अशक्यप्राय पराक्रम करुन लक्ष वेधलं आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 50 षटकांच्या मर्यादित स्पर्धेत 6 चेंडूत 6 षटकार खेचले आहेत. रविवारी रंगलेल्या सामन्यात त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. परेराने श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लबकडून खेळताना 13 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. यात त्याने 8 उत्तुंग षटकार ठोकले. विशेष म्हणजे 52 धावांपैकी 48 धावा त्याने बाउंड्रीच्या स्वरुपात काढल्या. बूमफिल्ड क्रिकेट एन्ड अॅथलेटिक क्लबच्या विरुद्ध परेराने दिलन कोरेच्या एका षटकात 6 षटकार खेचले.
थिसारा परेराच्या फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लबने 41 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 318 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ब्लूमफिल्ड क्लबने 17 षटकांच्या खेळात 73 धावांत 6 विकेट गमावल्या. अंधूर प्रकाशामुळे कोणत्याही निकालाशिवाय सामना स्थगित करावा लागला. सामन्याचा निकाल लागला नसला तरी थिसारा परेराच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली.
धोनीसोबत लढवय्या सॅम कुरेनचा फोटो का होतोय व्हायरल?
प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सहा षटकार खेचणारा परेरा हा नववा फलंदाज ठरला आहे. 50 षटकांच्या सामन्यात असा पराक्रम करणारा तो दुसरा खेळाडू आहे. सहा चेंडूत सहा षटकार खेचणारा तो पहिला श्रीलंकन फलंदाजही ठरलाय. लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये परेरा दुसऱ्या स्थानावर आहे.
सहा चेंडूत सहा षटकार खेचणारे फलंदाज
गॅरी सोबर्स (फस्ट क्लास क्रिकेट) 1968 8
रवि शास्त्री (फस्ट क्लास क्रिकेट) 1985
हर्षल गिब्ज (आंतरराष्ट्रीय वनडे) 2007
युवराज सिंग (T20I वर्ल्ड कप) 2007
रॉस व्हाइटली (T20 क्रिकेट ) 2017
हजरतुल्लाह झाझाई (T20 क्रिकेट) 2018
लियो कार्टर (T20 क्रिकेट) 2020
केरॉन पोलार्ड (T20I क्रिकेट) 2021
थसेरा परेरा (लिस्ट ए) 2021