AUSvsIND : टीम इंडियातील बाराव्या खेळाडूने मिळवला सामनावीर पुरस्कार   

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाने 11 धावांनी विजय मिळविला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाने 11 धावांनी विजय मिळविला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर भारतीय संघाने 20 षटकांत सात गडी गमावत 161 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाचा 150 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यानंतर या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या युजवेंद्र चहलला सामनावीराचा बहुमान देण्यात आला. मात्र संघातील बाराव्या खेळाडूला सामनावीर म्हणून निवड होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.    

पाकिस्तान क्रिकेट संघाला न्यूझीलंडमध्ये सरावबंदीच 

ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदा गोलंदाजी घेतल्यानंतर भारतीय संघाची सुरवात अडखळत झाल्याचे पाहायला मिळाले. तरी देखील केएल राहुलने केलेले अर्धशतक आणि रवींद्र जडेजाने केलेली वेगवान खेळी यामुळे भारतीय संघ 161 धावांपर्यंत पोहचू शकला. परंतु फलंदाजी दरम्यान रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला. मिशेल स्टार्कच्या 18व्या षटकात रविंद्र जडेजाला चेंडू लागल्यामुळे तो फिल्डिंग साठी मैदानात येऊ शकला नाही. यानंतर त्याच्या बदल्यात मैदानात आलेल्या यूजवेंद्र चहलने गोलंदाजी केली. क्रिकेट मधील कन्कशन सबस्टिट्यूटमुळे प्लेयिंग इलेव्हन मध्ये नसलेल्या यूजवेंद्र चहलला आजच्या सामन्यात गोलंदाजी करता आली.  

विलियमसनच्या द्विशतकाने न्यूझीलंड पाचशेच्या पार 

कन्कशन सबस्टिट्यूटच्या नियमानुसार सामनाधिकारी एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास त्याच्या जागी बदली खेळाडूला मैदानात उतरवण्यास परवानगी देतात. आणि हा खेळाडू नेहमीच्या खेळाडूप्रमाणे गोलंदाजी अथवा फलंदाजी करू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्या जागी चहलला मैदानात उतरविण्यास परवानगी देण्यात आली. आणि त्याने देखील चार षटक टाकत  25 धावा देऊन तीन बळी मिळवले. यात चहलने अ‍ॅरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड सारख्या फुलफॉर्म मध्ये असलेल्या फलंदाजांना माघारीचा रस्ता दाखवला.

युजवेंद्र चहल पहिलाच... 
जखमी खेळाडूऐवजी बदली म्हणून संघात आल्यावर सामनावीर होणारा युजवेंद्र चहल पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी स्थानिक क्रिकेट मध्ये सुपर सब म्हणून संघात आल्यावर सामनावीर होण्याचा मान शेन बॉंड, जेम्स अँडरसन, जीतन पटेल आणि मलिंगा बंदारा यांनी मिळवला आहे. बॉंडने तर 2005 च्या एकदिवसीय लढतीत सुपर सब येताना 19 धावांत 6 फलंदाज बाद केले होते. 


​ ​

संबंधित बातम्या