इंग्लंड क्रिकेट संघातील दोघांना कोरोनाची बाधा 

संजय घारपुरे
Sunday, 6 December 2020

पहिली लढत रद्द; आजच्या लढतीबाबत प्रश्न 

पार्ल : इंग्लंड क्रिकेट संघातील दोघांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली एकदिवसीय लढत रद्द करण्यात आली होती. आफ्रिका संघातील एकास कोरोना झाल्याने शुक्रवारी होणारी लढत रविवारपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. 

AUSvsIND T20: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताच टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा...

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघातील दोघांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजते. त्यामुळे संपूर्ण संघ विलगीकरणात आहे. या परिस्थितीत सामना घेणे अयोग्य होते, असा निर्णय दोन्ही देशांच्या मंडळांनी घेतला. उर्वरित मालिकेबाबत कोरोना चाचणीचा निकाल अधिकृतपणे जाहीर झाल्यावर होईल, असे इंग्लंड मंडळाने कळवले आहे. जैवसुरक्षित वातावरणात होत असलेल्या या मालिकेसाठी इंग्लंड तसेच आफ्रिका संघांचा मुक्काम केपटाऊन येथील एकाच हॉटेलमध्ये आहे. या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची शनिवारी चाचणी करण्यात आली. त्यात दोघांना लागण झाली होती. त्यानंतर इंग्लंड संघातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी झाली होती. त्याचा अंतिम अहवाल सोमवारी अपेक्षित आहे. त्यानंतर दौऱ्याचा निर्णय होईल; मात्र मालिका रद्द होण्याची शक्‍यता कमी आहे.

AUSvsIND 2 T20 : सर्वाधिक धावा देऊन देखील चहलने केला विक्रम  
 
मालिकेतील दुसरी लढत सोमवारी, तर तिसरी लढत बुधवारी आहे. या दोन्ही लढती केपटाऊनला आहेत. आता दुसरी लढत सोमवारऐवजी मंगळवारी होण्याची शक्‍यता आहे. प्रतिस्पर्ध्यातील ट्‌वेंटी 20 मालिकेपूर्वी आफ्रिकेच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती, तर दोघांना विलगीकरणात पाठवण्यात आले होते.


​ ​

संबंधित बातम्या