Vijay Hazare Trophy 2021 : मुंबईकराच एक शतक महाराष्ट्राच्या दोन शतकांवर पडलं भारी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 23 February 2021

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (19) धावांवर बाद झाला. पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या ऋतुराजला कुलकर्णीने बाद केले.

कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाने महाराष्ट्र संघला पराभूत केले. एकदिवसीय क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये हे दोन्ही संघ ग्रुप डी गटात आहेत. महाराष्ट्र विरुद्धच्या विजयाने मुंबईने आपला विजयी धडाका कायम ठेवलाय. दुसरीकडे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 279 धावा केल्या होत्या. महाराष्ट्राकडून यश नाहरने 119 आणि  अझीम काझीनं 104 धावा केल्या. मुंबईचा जलदगती गोलंदाज धवल कुलकर्णीने 44 धावा खर्च करुन 5 विकेट घेतल्या. त्यानंतर कर्णधार अय्यरच्या शतकाच्या जोरावर मुंबईने 47.2 षटकात टार्गेट पार केले.

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (19) धावांवर बाद झाला. पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या ऋतुराजला कुलकर्णीने बाद केले. नौशाद शेखला कुलकर्णीने खातेही उघडू दिले नाही. केदार जाधव अवघ्या 5 धावा करुन माघारी फिरला. अंकित बावणेही कुलकर्णीचा शिकार झाला. त्यालाही खाते उघडता आले नाही. आघाडीचे फलंदाज स्वस्तात आटोपल्यानंतर नाहर आणि काझी यांनी पाचव्या विकेटसाठी 214 धावांची भागीदारी केली. नाहरने 133 चेंडूत 7 चौकार आणि षटकाराची आतषबाजी केली. काझीने 118 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 104 धावा केल्या.

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईकडून यशस्वी जयस्वाल (40), पृथ्वी शॉ (34) यांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने 29 आणि शिवम दुबेने 47 धावांचे योगदान दिले.  श्रेयस अय्यर 99 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 103 धावा करुन संघाला विजयात मोलाचा वाटा उचलला. 

भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या