Vijay Hazare Trophy 2021 : महाराष्ट्र संघातील खेळाडूसह तीन गड्यांना कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 February 2021

हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र संघातील प्रत्येकी एका खेळाडूला गेल्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता, परंतु त्या खेळाडूंचा अपवाद वगळता या दोन्ही संघांना दुसरा साखळी सामना खेळण्यास परवानगी देण्यात आली.

नवी दिल्ली : विविध ठिकाणी सुरू असलेल्या विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केला आहे. महाराष्ट्र, बिहार आणि हिमाचल प्रदेश या संघांतील प्रत्येकी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली, परंतु त्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली नाहीत.

हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र संघातील प्रत्येकी एका खेळाडूला गेल्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता, परंतु त्या खेळाडूंचा अपवाद वगळता या दोन्ही संघांना दुसरा साखळी सामना खेळण्यास परवानगी देण्यात आली. बिहारचा कर्नाटकविरुद्धचा सामना सोमवारी झाला आणि त्यानंतर बिहारच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले, त्यामुळे बिहारच्या सर्व खेळाडूंची चाचणी करण्यात आली. तसेच सर्व खेळाडूंना विलग राहण्यास सांगण्यात आले आहे.

किंग कोहली म्हणाला, ईशांतच्या लांब केसांचेही कौतुकच वाटते

हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्राचे सामने जयपूर येथे सुरू आहेत; तर बिहारचा सामना बंगळूरला होत आहे.राष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या संघातील खेळाडूंना कोरोना होण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. मुश्‍ताक अली राष्ट्रीय ट्‌वेन्टी-20 स्पर्धेत जम्मू आणि काश्‍मीरच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली होती. स्पर्धा सुरू होण्याअगोदर प्रत्येक खेळाडूच्या तीन चाचण्या करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना जैवसुरक्षा वातावरणात आणण्यात आले होते.


​ ​

संबंधित बातम्या