‘बबल’चा येतोय उबग, जैव सुरक्षा वातावरणात किती काळ राहायचे?

पीटीआय
Tuesday, 30 March 2021

पुढचे दौरे तयार करताना बायो बबलचाही विचार करावा दोन-तीन महिने अशा वातावरणात रहाणे आणि मानसिकता कणखर ठेऊन खेळणे सोपे नाही, प्रत्येकाची मानसिकता एकाच पातळीवरची नसते, कधी कधी या सर्व गोष्टींचा उबग येतो, वातावरणात बदल हवा हवासा वाटतो, असे विराटने सांगितले. 

पुणे : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जैव सुरक्षा वातावरणाच्या चौकटीत रहाणे कठीण होत चालले आहे, किती काळ हा चक्रव्यूह सांभाळायचा, अशी नाराजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. आता पुढचे दौरे निश्‍चित करताना याचा विचार करावा, अशीही जाहीर मागणी त्याने केली.
इंग्लंडविरुद्धचा अखेरचा एकदिवसीय सामना जिंकून ही मालिकाही जिंकणाऱ्या विराटने ही व्यथा पारितोषिक वितरणात मांडली. ही मालिका संपल्यानंतर लगचेच सोमवारपासून आयपीएलमध्ये विविध संघांशी करारबद्ध असलेले दोन्ही संघातील खेळाडू त्यांच्या त्यांच्या संघात जाऊन पुन्हा जैव सुरक्षा वातारवणात सहभाही होणार आहेत. 9 एप्रिलपासून सुरू होणारी आयपीएल मे अखेरपर्यंत चालणार आहे.

पुढचे दौरे तयार करताना बायो बबलचाही विचार करावा दोन-तीन महिने अशा वातावरणात रहाणे आणि मानसिकता कणखर ठेऊन खेळणे सोपे नाही, प्रत्येकाची मानसिकता एकाच पातळीवरची नसते, कधी कधी या सर्व गोष्टींचा उबग येतो, वातावरणात बदल हवा हवासा वाटतो, असे विराटने सांगितले. 
तिन्ही प्रकारांत खेळणारे भारताचे प्रमुख खेळाडू ऑगस्टपासून जैव सुरक्षा वातावरणात आहे. सप्टेंबरमध्ये अमिरातीत झालेल्या आयपीएलसाठी सुरू झालेले विलगीकरण त्यानंतर जैव सुरक्षा चौकट तेथून थेट ऑस्ट्रेलिया दौरा आणि आता इंग्लंड दौरा पाठोपाठ आयपीएल असे चक्र फिरत राहिले आहे. यात ऑस्ट्रेलियातून परतल्यावर काही दिवसांचाच ब्रेक मिळाला होता. 
इंग्लंड क्रिकेट मंडळाने यातून मार्ग काढताना श्रीलंका आणि भारत दौऱ्यासाठी खेळाडूंच्या रोटेशन धोरणाचा अवलंब केला. मुळात त्यांचा कसोटी आणि मर्यादित षटकांचा संघ मोजक्‍या खेळाडूंचा अपवाद वगळता वेगवेगळा आहे.

Fifa World Cup Qualifiers : 'वार' नसल्यानं रोनाल्डोचा गोल नाकारला; वर्ल्डकप पात्रतेसाठी पोर्तुगालसमोर संकट

 सॅम करनची विक्रमाशी बरोबरी

इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनने रविवारी झालेल्या भारताविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक नाबाद 95 धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

आठव्या क्रमांकावरील सर्वाधिक धावा

95* सॅम करन वि. भारत (पुणे 2021)
95* ख्रिस वोक्‍स वि. श्रीलंका (नॉटिंगहॅम 2016)
92* आंद्रे रसेल वि. भारत (नॉर्थ साऊथ 2011)
92 नॅथन कुल्टर-नाईल वि. विंडीज (नॉटिंगहॅम 2019)
86* रवी रामपाल वि. भारत (विशाखापट्टणम 2011)
सहाशे धावा तरीही शतक नाही
656 : द. आफ्रिका (326) वि. ऑस्ट्रेलिया  (330) पोर्ट एलिझाबेथ 2002
651 : भारत (329) वि. इंग्लंड (322) पुणे 2021
649 : भारत (329) वि. इंग्लंड (320) ब्रिस्टॉल 2007
648 : इंग्लंड (351) वि. पाक (297) लीडस्‌ 2019

भारताचे इंग्लंडवर वर्चस्व 2021-21
कसोटी मालिका : 3-1
ट्‌वेन्टी-20 मालिका : 3-2
एकदिवसीय मालिका : 2-1

गेल्या 15 वर्षांतील भारताचे मायदेशातील (एकदिवसीय) इंग्लंडवरील वर्चस्व
2006 : विजय 5-1
2008 : विजय 5-0
2011 : विजय 5-0
2013 : विजय 3-2
2017 ः विजय 2-1
2021 : विजय 2-1
 


​ ​

संबंधित बातम्या