सर्वोत्तम खेळाडूसाठी विराटला नामांकन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

दशकातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कारासाठी विराट कोहलीला अश्‍विनसह इंग्लंडचा ज्यो रूट, न्यूझीलंडचा केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ यांचे प्रमुख आव्हान असेल.

दुबई: गेल्या 10 वर्षांतील म्हणजेच दशकातील सर्वोत्तम पुरस्कारासाठी आयसीसीने भारतीय कर्णधार विराट कोहलीसह आर. अश्‍विन याला नामांकन दिले आहे. विविध गटांसाठी ही नामांकनाची यादी आयसीसीने जाहीर करताना एकूण सात भारतीय खेळाडू वेगवेगळ्या गटात आहेत.

दशकातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कारासाठी विराट कोहलीला अश्‍विनसह इंग्लंडचा ज्यो रूट, न्यूझीलंडचा केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ यांचे प्रमुख आव्हान असेल.
 विराट कोहलीला एकूण तीन विभागात नामांकन मिळाले आहे. सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडूंच्या गटात एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके करणाऱ्या रोहित शर्मालाही विराटसह नामांकन आहे. स्पिरिट ऑफ क्रिकेट या पुरस्कारासाठीही विराटला नामांतन मिळाले आहे.

नामांकन यादी
दशकातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू  : विराट कोहली, आर. अश्‍विन, ज्यो रूट, केन विलियमसन, स्टीव स्मिथ, एबी डिव्हिल्यर्स आणि कुमार संगकारा
महिला खेळाडू (एकदिवसीय) : मेग लेनिंग, ईलेसी पेरी, मिथाली राज, सुझी बेटस्‌, स्टेफिन टेलर, जुलान गोस्वामी.
महिला खेळाडू : पेरी, लेनिंग, बेटस्‌, स्टेफिन टेलर, मिथाली राज, सारा टेलर.
पुरुष खेळाडू (एकदिवसीय) : विराट कोहली, लसिथ मलिंगा, मिशेल स्टार्क, एबी डिव्हिल्यर्स, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, कुमार संगकारा.
कसोटी खेळाडू : विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव स्मिथ, जेम्स अँडरसन, रंगाना हेराथ, यासिर शहा.
ट्‌वेन्टी-२० खेळाडू : रशिद खान, विराट कोहली, इम्रान ताहीर, ॲरॉन फिन्च, लसिथ मलिंगा, ख्रिस गेल, रोहित शर्मा.
स्पिरिट ऑफ क्रिकेट : विराट कोहली, विल्यमसन, ब्रॅंडन मॅकल्‌म, मिसबा उल हक, महेंद्रसिंग धोनी, डॅनियल व्हिटोरी, जयवर्धने, अन्या श्रुबसोल, कॅथरिन ब्रंट 


​ ​

संबंधित बातम्या