महिला क्रिकेटपटूच्या आईवरील उपचारासाठी विराटने केली आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 May 2021

भारतीय महिला संघाची माजी खेळाडू के. एस. सर्वांथी नायडू हिची आई एस. के. सुमन कोरोनामुळे आजारी असून तिच्या उपचारासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मदतीस धावला आहे. त्याने ६.७७ लाखाची आर्थिक मदत केली आहे.

नवी दिल्ली - भारतीय महिला संघाची माजी खेळाडू के. एस. सर्वांथी नायडू हिची आई एस. के. सुमन कोरोनामुळे आजारी असून तिच्या उपचारासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मदतीस धावला आहे. त्याने ६.७७ लाखाची आर्थिक मदत केली आहे.

सर्वांथी हिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सर्वांथी हिने १६ लाखांचा खर्च केलेला आहे. महिला क्रिकेट निवड समितीच्या माजी सदस्या आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष व खेळाडू असलेल्या शिवलाल यादव यांची बहिण एन. विद्या यादव यांनी सर्वांथीच्या आईवरील उपचारासाठी आर्थिक मदतीसाठी ट्वीट केले होते. हे ट्विट त्यांनी विराटलाही टॅग केले होते.विराटने लगेचच त्याची दखल घेतली.


​ ​

संबंधित बातम्या