WIvsSL : 'वजनदार' गड्याची अर्धशतकी छाप!

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 31 March 2021

या भागीदारीच्या जोरावर  वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 354 धावांपर्यंत मजल मारली, ब्रॅथवेटने सर्वाधिक126 धावा केल्या.  

वेस्टइंडिज आणि श्रीलंका यांच्यातील अँटीगामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात  (SL VS WI 2nd Test) कॅरिबियन फिरकीपटू रहकीम कॉर्नवाल (Rahkeem Cornwall) ने बॅटिंगमध्ये कमालीची कामगिरी केली. त्याने  93 चेंडूचा सामना करत 73 धावांची विश्वसनीय खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याने कसोटी सामन्यात 80 स्ट्राइक रेटने धावा करत सर्वांचे लक्षवेधले आहे. रहकीमने कॅप्टन क्रॅग ब्रॅथवेट (Kraigg Brathwaite) सोबत आठव्या विकेटसाठी 188 चेंडूत 103 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर  वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 354 धावांपर्यंत मजल मारली, ब्रॅथवेटने सर्वाधिक126 धावा केल्या.  

कॉर्नवालने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही अर्धशत झळकावले होते. पहिल्या कसोटी अर्धशतकावेळी त्याने 85 चेंडूत 61 धावा केल्या होत्या. यात त्याने 9 चौकार आणि दोन षटकार लगावले होते. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोट सामन्यात 140 किलो वजनाच्या या गड्याने गोलंदाजीतही कमालीची कामगिरी केली होती.  पहिल्या डावात एक आणि दुसऱ्या डावात तीन विकेट घेऊन आपल्या अष्टपैलू खेळीनं त्याने लक्षवेधून घेतले होते. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.  

IPL 2021 : पंतच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाचे ओझे

दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहुण्याची सुरुवात खराब झाली सलामीवीर जॉन कॅम्पबेल(5) आणि नुक्रमाह बोनर (5) स्वस्तात माघारी फिरल्यानंतर काइल मेयर्सने कर्णधार क्रॅग ब्रॅथवेटच्या साथीने 71 धावांची उपयुक्त भागीदारी केली. 49 धावांवर मेयर्सला तंबूचा रस्ता धरावा लागला. ठराविक अंतराने पडलेल्या विकेट्सनंतर वेस्ट इंडिजची अवस्था 7 बाद  222 असताना कॉर्नवाल मैदानात उतरला. त्याने कर्णधारासोबत तग धरत डावाला आकार दिला. श्रीलंकेनं तीन विकेटच्या मोबदल्यात 136 धावा केल्या आहेत.  लाहरू थिरिमानेने सर्वाधिक 55 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाअखेर धनंजय डी सिल्वा (23) आणि दिनेश चंडीमल (34) धावांवर नाबाद खेळत होते.   


​ ​

संबंधित बातम्या