विलियमसनच्या द्विशतकाने न्यूझीलंड पाचशेच्या पार
केन विलियमसनच्या अडीच शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत पाचशेचा टप्पा सहज पार केला.
हॅमिल्टन : केन विलियमसनच्या अडीच शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत पाचशेचा टप्पा सहज पार केला. आपण पाहिलेली ही सर्वोत्तम खेळी असल्याचे प्रशस्तिपत्र वेस्ट इंडिज कर्णधार केमार रॉश याने दिले.
AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या टी-ट्वेन्टी सामन्याच्या विजयाची कारणे
विलियमसनने वैयक्तिक सर्वोत्तम धावा करताना 251 धावांची खेळी साकारली. त्यामुळे न्यूझीलंडने पहिला डाव 7 बाद 519 या धावसंख्येवर घोषित केला. त्याने सहा वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध केलेल्या 242 धावांचा वैयक्तिक विक्रम मागे सारला. विंडीजने पहिल्या दिवसअखेर बिनबाद 49 अशी सुरुवात केली.
बदली खेळाडू म्हणून आलेल्या चहलची कमाल; वाचा नेमके काय घडले
साडेदहा तासांच्या खेळीत विलियमसनने 412 चेंडूत 34 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने संघाच्या धावगतीस वेग देण्यासाठी द्विशतकानंतर फटकेबाजी सुरू केली. त्याने 42 चेंडूत 51 धावा केल्या. विलियमसनने तो बाद झाल्यानंतरच्या तिसऱ्या षटकात डाव घोषित केला.