बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेच्या हत्येचा कट? पाक क्रिकेटर अडचणीत
महिलेला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे कोर्टाने सुनावले होते. त्यानंतर घडलेल्या या प्रकरणामुळे बाबर आझमच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
पाकिस्तानन क्रिकेटमधील लोकप्रिय चेहरा असलेल्या बाबर आझमच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतानाचे चित्र आहे. मागील महिन्या एका महिलेने बाबरवर लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आणि गर्भपात करायला लावल्याचा गंभीर आरोप केला होता. आता याच महिलेनं त्याच्याव हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित व्यक्तीने दावा केलाय की, तिच्या वाहनावर अज्ञातांनी बेछूड गोळीबार केला. यात तिचे प्राण वाचले. लाहोर येथील कान्हा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दुचाकीवर काही अज्ञातांनी या महिलेच्या गाडीवर गोळीबार केला. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मागील काही दिवसांपासून या महिलेला धमकीचे फोनही येत आहेत. संबंधित महिलेने पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे सुरक्षेची मागणी देखील केली आहे.
पाकिस्तानच्या 'विराट कोहली'वर लैंगिक शोषणाचे आरोप; लग्नाचं वचन देऊन दिला धोका
यापूर्वी महिलेने बाबर विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याचं प्रकरण कोर्टातही गेले आहे. कोर्टाने बाबर आझम आणि त्याच्या कुटुंबियांना फटकारले देखील होते. महिलेला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे कोर्टाने सुनावले होते. त्यानंतर घडलेल्या या प्रकरणामुळे बाबर आझमच्या अडचणी आणखी वाढू शकतात.