ODI सर्वाधिक 50 + रेकॉर्ड बूकात सचिन-विराटमध्ये अंतर किती?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 2 December 2020

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करुन अशक्यप्राय विक्रम नोंदवला आहे. क्रिकेटच्या देवाने नोंदवलेली ही अशक्यप्राय खेळी विराट कोहली सहज पार करेल, अशी चर्चा अनेकदा रंगताना दिसते. सचिनच्या शतकी विक्रमाचा पाठलाग विराट कोहली ज्या गतीने करत आहे ते पाहिल्यास एक नवा विश्वविक्रम नोंदवण्यात कोहली यशस्वी ठरेल असेही वाटते, पण त्यासाठी तो नेमका किती वेळ घेणार आणि ते शक्य होणार का? याचे उत्तर येणारा काळच देईल. 

क्रिकेटच्या मैदानात दोन दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारा सचिन तेंडुलकर आणि सध्याच्या घडीला प्रत्येक सामन्यात नवा विक्रम नोंदवणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या खेळीची तुलना नवी नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराटने सचिनचा एक विक्रम मागे टाकल्यानंतर या दोघांत भारी कोण? अशी चर्चाही रंगण्यास सुरुवात झाली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करुन अशक्यप्राय विक्रम नोंदवला आहे. क्रिकेटच्या देवाने नोंदवलेली ही अशक्यप्राय खेळी विराट कोहली सहज पार करेल, अशी चर्चा अनेकदा रंगताना दिसते. सचिनच्या शतकी विक्रमाचा पाठलाग विराट कोहली ज्या गतीने करत आहे ते पाहिल्यास एक नवा विश्वविक्रम नोंदवण्यात कोहली यशस्वी ठरेल असेही वाटते, पण त्यासाठी तो नेमका किती वेळ घेणार आणि ते शक्य होणार का? याचे उत्तर येणारा काळच देईल. 

रनमशिन विराटच्या विक्रमी खेळीनंतर विक्रमादित्य सचिन ट्रेंडिगमध्ये

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहली 89 धावांवर बाद झाला. सचिनच्या शतकी विक्रमाचे अंतर कमी करण्याची त्याची संधी अवघ्या 11 धावांनी हुकली. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत कोहलीने दमदार सुरुवात केली. तो शतकी खेळीकडे वाटचाल करतोय असे चित्र दिसत असताना हेजलवूडने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. सचिन आणि विराट यांच्यात वनडेत सर्वाधिक अर्धशतकांचीही शर्यत सुरु आहे. सध्याच्या घडीला अर्थातच यात सचिनच आघाडीवर आहे. 

कोहलीची 'विराट' विक्रमाला गवसणी; सचिनचा खास रेकॉर्ड टाकला मागे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 463 वनडे सामन्यात  145 डावात 50 + धावा करण्याचा पराक्रम केलाय. विराट कोहली सचिनच्या या विक्रमाचाही पाठलाग करतोय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 63 धावांच्या खेळीसह विराटने आतापर्यंत 103 वेळा 50 + धावा केल्या आहेत. यासाठी त्याने 251 वेळा फलंदाजी केली आहे. विराट कोहली ज्या वेगाने आपला डाव पुढे नेताना दिसतोय त्यात या विक्रमाला तो गवसणी घालणार का? आणि यासाठी त्याला किती वेळा बॅटिंग करावी लागणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.  

​ ​

संबंधित बातम्या