विराटची पहिली ऑडी कार पोलिस ठाण्यात धूळ खात का पडलीये?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 13 December 2020

2012 मध्ये ऑडी इंडियाची R8 ही कार विराटकडे होती. ऑडीची त्याच्याकडे असलेली ही पहिली कार होती. हीच कार पोलिस ठाण्यात धुळ खात पडली आहे. विराट कोहलीनं वापरलेली ही कार पोलिस ठाण्यात कशी? असा प्रश्नही अनेकांना नश्चित पडला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील श्रीमंत खेळांडूपैकी एक आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला कोहली अनेक मोठ्या ब्रँडचा पोस्टर बॉय आहे. अनेक युवा क्रिकेटर कोहलीकडे रोल मॉडेल म्हणून पाहतात. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपल्या हटके आणि आक्रमक अंदाजाने खेळणारा विराट कोहलीचा मोठा फॅन क्लॅब दिसून येतो. कोहलीसंदर्भातील प्रत्येक बातमीसाठी त्याचे चाहते उत्सुक असतात.

आक्रमक खेळामुळे अल्पावधित अनेक विक्रमाला गवसणी घालणारा विराट कोहली अलिशान कारचा शौकिन आहे. कोहली Audi इंडियाचा ब्रँड अँबेसिडरही आहे. त्यामुळेच कोहली ऑडी इंडियाच्या प्रत्येक नव्या कारच्या लॉन्चिगमध्ये हमखास दिसतो. विराट कोहलीला प्रत्येक वेळी नवी कार मिळत असेल तर त्याच्या जुन्या कारचे काय होते? असा प्रश्न त्याच्या अनेक चाहत्यांना नक्की पडत असेल. त्यानंतर आता आणखी एक चर्चा रंगलेय ती म्हणजे विराटची पहिली ऑडी पोलिस स्टेशनमध्ये का? सध्याच्या घडीला  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची एक जुनी कार महाराष्ट्रातील पोलिस ठाण्यात धूळ खात पडल्याची जोरदार चर्चा आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेल्या युवा क्रिकेटरने उडवला लग्नाचा बार!

2012 मध्ये ऑडी इंडियाची R8 ही कार विराटकडे होती. ऑडीची त्याच्याकडे असलेली ही पहिली कार होती. हीच कार पोलिस ठाण्यात धुळ खात पडली आहे. विराट कोहलीनं वापरलेली ही कार पोलिस ठाण्यात कशी? असा प्रश्नही अनेकांना नश्चित पडला असेल. 2016 मध्ये ब्रोकरच्या माध्यमातून विराटने ही कार सागर ठक्कर नावाच्या व्यक्तीला विकली होती. 

लेकीविषयी पसरलेल्या अफवांमुळं आफ्रिदी भडकला!

एका वेबसाइटच्या वृत्तानुसार, सागर ठक्कर याने विराटकडून घेतलेली कार आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट दिली होती. एका घोटाळ्यमध्ये सागर अडकल्यानंतर पोलिसांनी त्याची ही कार जप्त केली असून ती आता पोलिस ठाण्यात धूळ खात पडली आहे. विराटने ही कार  2.5 कोटी रुपयांना विकली होती. कागदपत्रांची पुर्तता योग्यरित्या केल्यामुळे विराट घोटाळा प्रकरणातील केसमध्ये कोणत्याही अडचणीत सापडला नव्हता.  
 


​ ​

संबंधित बातम्या