World Cup 2011 : 10 वर्षानंतर 12 नंबरी जर्सीने शेअर केला खास व्हिडिओ

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 2 April 2021

युवराज सिंहने वर्ल्ड कपच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये युवी 2011 मध्ये मैदानात उतरलेल्या जर्सी घातल्याचे पाहायला मिळते.

ICC Cricket World Cup 2011: भारतीय क्रिकेट संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली 2 एप्रिल 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. या गोष्टीला 10 वर्षे उलटली असली तरी तो सोनेरी क्षण आजही क्रिकेट चाहता विसरलेला नाही. 10 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी टीम इंडियाने श्रीलंकेला पराभूत करत वानखडेच्या मैदानावर इतिहास रचला होता. भारतीय संघाच्या विजयात अष्टपैलू युवीने मोलाचा वाटा उचलला होतो. जसे क्रिकेट चाहते हा सोनेरी दिवस विसरलेले नाहीत तसाच या वर्ल्डकपचा स्टार युवीसाठीही हा दिवस अविस्मरणीय असाच आहे.     

युवराज सिंहने वर्ल्ड कपच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये युवी 2011 मध्ये मैदानात उतरलेल्या जर्सी घातल्याचे पाहायला मिळते. 2 एप्रिल 2011 तारीख ऐतिहासिक आहे. देशासाठी अभिमानास्पद असलेल्या त्या दिवसाचे वर्णन शब्दांत होऊ शकत नाही. पण ही गोष्ट मैदानात आणि मैदानाबाहेर आम्हाला प्रेरणादायी ठरेल, अशीच आहे, असे युवीने म्हटले आहे.  

2011 चा वर्ल्ड कप जिंकून उपकार केले नाहीत : गौतम गंभीर

2 मिनिटे आमि 19 सेकंदाच्या व्हिडिओत युवीने आपल्या सर्व सहाकाऱ्यांना विजयाचे श्रेय दिले आहे. संघाला एकजूट ठेवण्यासाठी तत्कालीन प्रशिक्षक गॅरी कर्स्टनपासून ते जलदगती गोलंदाज झहिर खान या सर्वच सदस्यांचा ऐतिहासिक विजयात महत्त्वाचा रोल होता, असा उल्लेख युवीने व्हिडिओमध्ये केला आहे.

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सची पंत गादी चालवणार

वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 275 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या डावाची सुरुवात अगदीच खराब झाली होती. विरेंद्र सेहवागला खातेही उघडता आले नाही. अखेरचा वर्ल्ड कप खेळणाऱ्या मास्टर सचिन तेंडुलकरने 18 धावा करुन तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर  गौतम गंभीरने 97 धावांची खेळी करत डाव सावरला. विराट कोहली 35 धावा करुन बाद झाला. त्यानंतर फिनिशिंगट टच देणाऱ्या धोनीसोबत युवराज सिंग मैदानात होता. धोनीने 79 चेंडूत 91 धावा केल्या होत्या. तर युवीने 24 चेंडूत 2 चौकारांसह 21 धावा करुन नाबाद राहिला होता. धोनीला मॅन ऑफ द मॅच तर युवीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आली आहे.  


​ ​

संबंधित बातम्या