युवीचे षटकार पुन्हा पाहायला मिळणार; T20 तून कॅमबॅक करण्याचे संकेत

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 15 December 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र युवराज सिंग आता क्रिकेटच्या मैदानात पुन्हा उतरण्याच्या तयारीत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरवात केली आहे. तर, सय्यद मुश्ताक अली टी -ट्वेन्टी क्रिकेटच्या माध्यमातून भारतातील स्थानिक क्रिकेट लवकरच चालू होणार आहे. आणि या स्पर्धेसाठी पंजाबच्या संघाने तीस खेळाडूंची यादी जाहीर केली असून, या यादीत युवराज सिंगचा देखील समावेश करण्यात आला आहे. 

AUSvsIND : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील अविस्मरणीय विजयाची कहाणी

युवराज सिंगने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. परंतु त्यानंतर पंजाब क्रिकेट असोसिएशनने त्याला आपल्या घरच्या संघाकडून खेळण्याची विनंती केली होती. आणि त्याने यास सहमती दर्शविली होती. त्यामुळे युवी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण युवराज सिंग स्पर्धेत भाग घेणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय पीसीएचे सचिव पुनीत बाली यांनी, युवराज सिंग मैदानात उतरण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उत्तराची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी युवराज सिंगला परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची परवानगी बीसीसीआयने दिली होती.

ऑस्ट्रेलियाला दुखापतीची साडेसाती कायम; आता वेगवान गोलंदाज सिन ऍबॉट जखमी

सय्यद मुश्ताक अली टी -ट्वेन्टी स्पर्धा 10 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार असल्याचे नुकतेच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जाहीर केले आहे. तर युवराज सिंगने देखील पुन्हा सराव सुरु केला आहे. युवराज सिंगने सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर नेट प्रॅक्टिस करत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो उत्तम फटका लावताना दिसत आहे.        

दरम्यान, युवराज सिंग हा भारतीय क्रिकेट संघाचा महत्वाचा खेळाडू राहिलेला आहे. 2007 च्या टी -ट्वेन्टी वर्ल्डकप आणि 2011 च्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. आणि त्याने या दोन्ही स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. व तो मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराचा मानकरी देखील ठरला होता.    


​ ​

संबंधित बातम्या