विश्‍वकरंडक क्रमवारीत झिम्बाब्वे, आयर्लंडही टीम इंडियापेक्षा सरस 

संजय घारपुरे
Wednesday, 2 December 2020

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग क्रमवारीत विराट कोहलीचा भारतीय संघ अखेरच्या सहाव्या क्रमांकावर आहे.

मुंबई : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग क्रमवारीत विराट कोहलीचा भारतीय संघ अखेरच्या सहाव्या क्रमांकावर आहे. आयर्लंड तसेच झिम्बाब्वेने सध्या भारतास मागे टाकले आहे. षटकांची गती न राखल्यामुळे भारतास एका गुणाचा दंड करण्यात आला आहे. त्यामुळे भारत मागे पडला आहे.

या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया सहा सामन्यांनंतर 40 गुणांसह पहिले आहेत, तर भारत 9 गुणांसह सहावा आहे. इंग्लंड 30 गुणांसह दुसरे, तर पाकिस्तान 20 गुणांसह तिसरे आहेत. भारताप्रमाणेच पाकिस्तान, झिम्बाब्वे (10), आयर्लंड (10) हे प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. 

AUSvsIND : जाणून घ्या तिसऱ्या सामन्यातील टीम इंडियाच्या विजयाची 5 कारणे

आयर्लंड तसेच झिम्बाब्वे हे अनुक्रमे इंग्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत भारताप्रमाणेच 1-2 पराजित झाले. या सुपर लीगमध्ये विजयासाठी दहा गुण देण्यात येतात. मात्र भारताने षटकांची गती न राखल्याने भारतास एका गुणाचा दंड करण्यात आला. त्यामुळे भारताचे गुण नऊ झाले. झिम्बाब्वे, आयर्लंडपेक्षा सरस धावगती असूनही भारतास मागे जावे लागले. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश एकही सामना न खेळल्याने सध्या त्यांना या क्रमवारीत स्थान नाही. 

भारतात 2023 मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी या सुपर लीग क्रमवारीतील अव्वल सात संघांना थेट प्रवेश असेल. यजमान असल्याने भारताचा प्रवेश निश्‍चित आहे.


​ ​

संबंधित बातम्या