यांचा फिटनेस बघा! वयाच्या ६२ व्या वर्षी पुणेकर आजोबा झाले आयर्न मॅन!

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

-  दशरथ जाधव /exvr वयाच्या ६२ वर्षी आर्यन मॅन स्पर्धा जिकली.

- गत वर्षी ही त्यांनी वयाच्या 61 व्या वर्षी आर्यन मॅन स्पर्धेत  विजय मिळवला होता. 

व्हिएन्ना : क्लेजेनफर्ट ऑस्ट्रिया येथे रविवारी झालेल्या आर्यन मॅन स्पर्धेत पुण्याच्या 'दशरथ जाधव' यांनी बाजी मारली असून  सर्वात  वृद्ध भारतीय आर्यन मॅन बनण्याचा मान मिळवला आहे  जाधव यांनी  वयाच्या ६२ वर्षी आर्यन मॅन स्पर्धा जिकली आहे .

सत्रा तासाची ही स्पर्धा त्यांनी  पंधरा तास तेवीस मिनिटांत पूर्ण केली आहे. तरुणांन पुढे एक आदर्श ठेवला आहे. गत वर्षी ही त्यांनी वयाच्या 61 व्या वर्षी आर्यन मॅन स्पर्धा पूर्ण करून विजय मिळवला होता. 

 फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉरपोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित एक लांब-अंतर ट्रायथलॉन रेस आहे, यात 3.8 किमी पोहणे 180.2 किमी सायकल चालवणे आणि 42.20 किमी धावणे समाविष्ट आहे. त्या क्रमाने आणि ब्रेकशिवाय. हा संपूर्ण जगातील सर्वात कठीण एक दिवसीय सहनशीलता कार्यक्रमांपैकी एक आहे.


​ ​

संबंधित बातम्या