वॉर्नर-फिंचच्या भागीदारीचा विक्रम

टीम ई-सकाळ
Tuesday, 25 June 2019

सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच या सलामीच्या जोडीकडून ऑस्ट्रेलियाला सातत्याने चांगली सुरवात मिळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या यशात या दोघांची कामगिरी निर्णायक ठरत आहे.

लॉर्डस : सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच या सलामीच्या जोडीकडून ऑस्ट्रेलियाला सातत्याने चांगली सुरवात मिळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या यशात या दोघांची कामगिरी निर्णायक ठरत आहे.

इंग्लंडविरुद्ध त्यांनी आज 123 धावांची भागीदारी केली. या भागीदारीने त्यांनी विश्‍वविक्रमाची नोंद केली. या दोघांची विश्‍वकरंडक स्पर्धेतील ही सलग पाचवी पन्नास किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी ठरली.

यापूर्वी ग्रॅंट फ्लॉवर-ख्रिस टॅवरे इंग्लंड, 1983), डेव्हिड बून-जिऑफ मार्श (ऑस्ट्रेलिया, 1987 आणि 92), अमीर सोहेल-सईद अन्वर (पकिस्तान, 1996), ऍडम गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया 2003 आणि 2007) यांनी प्रत्येकी चारवेळी अशा सलग भागीदारी केल्या आहेत.


​ ​

संबंधित बातम्या