हॅट्ट्रिक - वॉर्नर सामनावीर बनण्याची  कांगारूंच्या विजयाची अन्‌...

वृत्तसंस्था
Saturday, 2 November 2019

मेलबर्न  - ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 क्रिकेट मालिकेत तीन हॅट्ट्रिक झाल्या. कांगारूंनी सलग तिसरा सामना जिंकला. पर्यायाने लंकेला सलग तिसऱ्यांदा पराभूत व्हावे लागले. यात सर्वाधिक महत्त्वाची हॅट्ट्रिक झाली ती डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची. तो सलग तिसऱ्यांदा "सामनावीर' बनला. "मालिकावीर' हा मानही त्यालाच मिळाला. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. श्रीलंकेला 6 बाद 142 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर कांगारूंनी 18 व्या षटकात लक्ष्य गाठताना सात विकेट राखून विजय मिळविला. कांगारूंनी पहिला सामना 134 धावांनी, तर दुसरा सामना नऊ विकेट राखून जिंकला होता. 

वॉर्नरला 12 धावांवर जीवदान मिळाले. याचा त्याने पुरेपूर फायदा उठविला. फिंच हासुद्धा 15 धावांवर सुदैवी ठरला. लंकेने मधल्या टप्प्यात तीन विकेट मिळविल्या, पण त्यांना कदापी संधी नव्हती. 

नैराश्‍यामुळे ब्रेक घेतलेल्या ग्लेन मॅक्‍सवेल याच्याऐवजी बेन मॅक्‌डमरमॉटला संधी मिळाली, पण तो चौथ्या क्रमांकावर केवळ पाच धावा करू शकला. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. 

संक्षिप्त धावफलक ः 

श्रीलंका ः 20 षटकांत 6 बाद 142 (कुशल परेरा 57-45 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, अविष्का फर्नांडो 20, भानुका राजपक्षे नाबाद 17-11 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, मिचेल स्टार्क 4-0-32-2, केन रिचर्डसन 4-0-25-2, पॅट कमिन्स 4-0-23-2) पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ः 17.4 षटकांत 3 बाद 145 (ऍरॉन फिंच 37-25 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार, डेव्हिड वॉर्नर नाबाद 57-50 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, स्टीव स्मिथ 13, ऍश्‍टन टर्नर नाबाद 22-15 चेंडू, 2 षटकार, लसित मलिंगा 4-0-22-1, लाहिरू कुमारा 4-0-49-1, नुवान प्रदीप 3.4-0-20-1) 
 
​ ​

संबंधित बातम्या