बीसीसीआयच्या ट्विटमुळे धाेनीच्या चाहत्यांमध्ये परमानंद
बीसीसीआयने आज (गुरुवार) सकाळी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे स्मितहास्य करतानाचे छायाचित्र ट्विटरर पोस्ट करुन स्माईल इज दिस वे टू बी असे नमूद केले आहे.
बीसीसीआयने आज (गुरुवार) सकाळी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे स्मितहास्य करतानाचे छायाचित्र ट्विटरर पोस्ट करुन स्माईल इज दिस वे टू बी असे नमूद केले आहे. बीसीसीआयच्या ट्विटवर धोनीच्या चाहत्यांनी धोनी विल कम बॅक, हार्टबीट, मिस यू , लव्ह यू, धोनी इज कमिंग बॅक अशा प्रतिक्रिया देत धोनीवरील प्रेम व्यक्त करीत आहेत.
Smile is the way to be
— BCCI (@BCCI) March 19, 2020
एकदिवसीय विश्वचषक नंतर क्रिकेटच्या मैदानावर धोनी अद्याप परतलेला नाही. आयपीएल 2020 च्या माध्यमातून त्याला आपला खेळ दाखवायची संधी आहे. परंतु कोरोना विष्णूाच्या फटक्यामुळे आयीपएलचे आयोजन लांबणीवर पडले आहे. आयपीएल रद्द झाली तर धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्द संपुष्टात येईल, असेही म्हटले जात आहे. दूसरीकडे त्याच्या फिटनेसबद्दलही चर्चा सुरु झाली आहे.
याबाबत भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने धोनीबाबत एक ट्विट केले आहे. त्यात जाफरने म्हटले आहे की, " धोनी जर खरंच फिट असेल तर त्याचा विचार भारतीय संघासाठी करायला हवा. धोनी एक निष्णात यष्टीरक्षक आहे. त्याचबरोबर धोनीकडे भरपूर अनुभव आहे. या दोन्ही गोष्टींचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो असे म्हटले आहे. सध्याच्या स्थिती भारतीय संघ पाहिला तर धोनी एवढा अनुभव कोणत्याही खेळाडूकडे नाही. धोनीच्या जागेवर संघाने रिषभ पंतला बऱ्याचदा संधी देऊन पाहिले, पण तो सातत्याने अपयशीच राहीला आहे. त्यामुळे आता जर 2020 विश्वचषकासराख्या मोठ्या स्पर्धेत खेळायचे असेल, तर धोनीच्या नावाचा नक्कीच विचार केला जाऊ शकतो, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
If Dhoni is fit and in form I think we can't look beyond him as he'll be an asset behind the stumps and also lower down the order. It'll take the pressure of keeping off Rahul and India can play Pant as a batsman too if they want a lefty. #Dhoni #MSDhoni #IPL2020
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 18, 2020
बीसीसीआयने आज केलेल्या ट्विटमध्ये धोनीचे पुनरागमन व्हावे अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. धोनी वन्स अ लिजेंड, ऑलवेझ लिजेंड, द स्माईल वी वॉटेंड टू सी ऍगेन अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बीसीसीआयच्या आजच्या ट्विटमुळे माहीचे पुनरागमन होईलच अशी आशा क्रिकेटप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.