कर्णधारावर प्रशिक्षक लादू नका; वेंगसरकरांनी केले शास्त्रींचे अप्रत्यक्ष समर्थन

सागर शिंगटे
Thursday, 1 August 2019

'बीसीसीआय'कडून राज्य संघटनांना निधी मिळणे बंद झाल्याने क्रिकेटच ठप्प होण्याची भीती आहे. राज्य क्रिकेट संघटनांच्या निवडणुका झाल्यास संघटनांचे प्रश्न सुटतील, असेही वेंगसरकरांनी नमूद केले. वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतीय संघच वरचढ राहील, असे त्यांनी सांगितले.

पिंपरी : "कर्णधाराच्या म्हणण्यावर अवलंबून राहता येत नाही. परंतु, एखादा प्रशिक्षक त्याच्यावर लादल्यास संघाची कामगिरी खराब होईल,'' असे सांगत माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांचे अप्रत्यक्ष समर्थन केले. 

निवड समितीमधील पाच जणांना मिळून जेमतेम 13 कसोटी सामन्यांचा अनुभव असेल तर त्यांना नेहमी कर्णधार किंवा प्रशिक्षकाकडे पहावे लागेल, असे सांगत त्यांनी एम. एस. के. प्रसाद आणि सहकाऱ्यांवर निशाणा साधला. 
'बीसीसीआय' प्रशासकीय समितीने गेली तीन वर्षे लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली नाही. एखाद्या शिफारशीबद्दल काही अडचणी असल्यास 'ऍमिकस क्‍यूरी' (न्यायालयीन मित्र) यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय घ्यावा.

'बीसीसीआय'कडून राज्य संघटनांना निधी मिळणे बंद झाल्याने क्रिकेटच ठप्प होण्याची भीती आहे. राज्य क्रिकेट संघटनांच्या निवडणुका झाल्यास संघटनांचे प्रश्न सुटतील, असेही वेंगसरकरांनी नमूद केले. वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतीय संघच वरचढ राहील, असे त्यांनी सांगितले.

​ ​

संबंधित बातम्या