डॉ. स्वरुप पुराणिक ठरले टेक्ससचे आयर्न मॅन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 May 2019

मुंबई : इच्छा तेथे मार्ग असे म्हटले जाते आणि ते खरंच आहे. हे डॉ. स्वरुप पुराणिक यांच्या बाबतीत अगदी खरे ठरले आहे. तुमच्यातील ताकदीची परीक्षा घेणारी क्रीडा क्षेत्रातील बहुधा सगळ्यात कठीण चाचणी म्हणजेच आयर्न मॅन ट्रायथलॉन पूर्ण करण्याच्या त्यांच्या अद्वितीय महत्त्वाकांक्षेपासून त्यांना कोणीही रोखू शकलेले नाही.

मुंबई : इच्छा तेथे मार्ग असे म्हटले जाते आणि ते खरंच आहे. हे डॉ. स्वरुप पुराणिक यांच्या बाबतीत अगदी खरे ठरले आहे. तुमच्यातील ताकदीची परीक्षा घेणारी क्रीडा क्षेत्रातील बहुधा सगळ्यात कठीण चाचणी म्हणजेच आयर्न मॅन ट्रायथलॉन पूर्ण करण्याच्या त्यांच्या अद्वितीय महत्त्वाकांक्षेपासून त्यांना कोणीही रोखू शकलेले नाही.

37 वर्षीय डॉ. स्वरुप (पेरीओडोंटिस्ट आणि आयआयएम पदवीधर) दुहेरी जबाबदारी सांभाळतात. भारतातील सर्वात मोठ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक समुहांमध्ये गणल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील डीवाय पाटील युनिर्व्हसिटीचे ते संचालक आहेत आणि ट्रायथलॉन अॅथलेटही. यंदाच्या उन्हाळ्यात 27 एप्रिल रोजी त्यांनी टेक्सास येथे त्यांची दुसरी आयर्न मॅन उत्तर अमेरिकन चॅम्पियनशीप पूर्ण केली. यापूर्वी डॉ. स्वरूप यांनी दुबई येथे फेब्रुवारी 1, 2019 रोजी आयरन मॅन 70.3 चॅम्पियनशिप पूर्ण केली.

आयर्न मॅन ट्रायथलॉन हा ट्रायथलॉनमधील अत्यंत अवघड प्रकार आहे. यात 4000 मी. खुल्या पाण्यात पोहणे 180 किमी सायकलिंग 42 किमी रन असते. हे सगळे न थांबता याच क्रमाने करायचे असते. ही स्पर्धा पूर्ण करण्यास 16 तासांचा वेळ दिला जातो. जगभरातील हा एक सर्वात कठीण आणि दमवणारा एक दिवसीय क्रीडाप्रकार मानला जातो.

(तास कलम: किमान) अधिकृत रेकॉर्ड, डॉ स्वरूप वेळ प्रत्येक गेम पूर्ण केली आहे खालील आहे: जलतरण (1:27:36), सायकलिंग (7:09:29) आणि धावणे (07:35:43) परिणामी, डॉ. स्वरुपने ही त्रैथलॉन रेस 16 तास 31 मिनिटे आणि 12 सेकंदात पूर्ण केली. श्री. माइक रीले यांना अंतिम रेषेजवळ पाहता यावे ही आयर्न मॅन पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते, चॅम्पियनशिप पूर्ण केल्यानंतर डॉ. स्वरोपाला हाय-फाइव्ह दिली. (चित्र मध्ये पाहिले जाऊ शकते.)

डॉ. स्वरुप म्हणाले, "स्पर्धा पूर्ण केल्यानंतर मला काय वाटले हे शब्दांत कदाचित मांडता येणार नाही. हे यश म्हणजे जगभरातील ०.१ टक्क्यांहून कमी अॅथलेट जी स्पर्धा पूर्ण करतात असे काहीतरी मिळवणे. यासाठी फक्त आपणच नाही तर आपल्या कुटुंबियांनीसुद्धा अनेक तडजोडी केलेल्या असतात. तुम्ही शारीरिकदृष्ट्या कितीही फिट असलात तर त्याचा वाटा फक्त २० टक्के असतो. उरलेला ८० टक्के वाटा असतो तुमचे मन, तुमची इच्छाशक्ती आणि तुमची महत्त्वाकांक्षा यांचा. तुमच्यातील ताकद जोखणारी जगातील सर्वाधिक कठीण अशी ही एकदिवसीय स्पर्धा पूर्ण करणे हा आनंदायी, पुर्णत्व देणारा आणि समाधानकारक अनुभव आहे."

डॉ. स्वरुप यांच्या या यशाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक कोचिंग यासाठी घेतलेले नाही. काम, प्रशिक्षण, व्यायाम... इतकी विविध कामे त्यांच्या हातात असतात हे पाहता अर्थातच ही कामगिरी सोपी नव्हती. "खेळ हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण, मी नशिबवानही आहे. माझ्या कुटुंबाचा (वडील श्री. विश्वास पुराणिक, आई श्रीमती. स्वाती पुराणिक, पत्नी श्रीमती. अक्षता पुराणिक) आणि कामाच्या ठिकाणचा पाठिंबा मला मिळाला आहे," असे सांगत डॉ. स्वरुप म्हणाले, "डीवाय पाटील स्टेडिअममधील सुविधा जागतिक दर्जाच्या आहेत आणि याच सुविधांमुळे मी आयर्नमॅन बनू शकलो, हे सांगताना मला आनंद वाटतो. शिवाय, स्वत: खेळाडू आणि प्रचंड क्रीडाप्रेमी बॉस मिळणं (नवी मुंबईतील डीवाय पाटील युनिर्व्हसिटीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील) यामुळेही फायदा होतो. त्यामुळे सगळंच वातावरण मला हितकारक होतं आणि या सगळ्याचे आभार मानावे तितके कमीच आहेत."

डॉ. स्वरुप यांच्यासाठी ताकद हा काही नवा विषय नाही. आजवरच्या आयुष्यात ते नेहमीच कसलेले अॅथलेट आणि खेळाडू राहिले आहेत. अगदी लहानपणापासून ते पोहणे आणि इतर क्रीडाप्रकार खेळताहेत. त्यामुळे, या स्पर्धेसाठी त्यांनी तयारी केली यात काहीच आश्चर्य नाही. खेळातील त्यांचे यश लक्षणीय आहे. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अंडर १७ आणि अंडर १९ तसेच युनिर्व्हसिटी स्पर्धांमध्ये पोहण्यातील त्यांनी अनेक पदके मिळवली आहेत. ते जिल्हास्तरीय आणि विभागीय स्तरावरील टेबल टेनिलपटू होते. ते जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू आणि राज्यस्तरीय कबड्डीपटू होते. ते नॅशनल क्लास बी बुद्धिबळपटू आणि टेनिसपटूही होते.

डॉ. स्वरुप गेली २० वर्षे मॅराथॉनमध्ये भाग घेत आहे. आजवर त्यांनी देशभरातील पूर्ण आणि अर्धमॅराथॉनमध्ये पहिल्या ५० मध्ये स्थान मिळवले आहे आणि ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय मॅराथॉन्समध्ये भाग घेतला आहे.

त्यांनी विविध अॅक्वाथॅलॉन्स (पोहणे आणि धावणे) आणि बायथॅलॉक्स (सायकलिंग आणि धावणे)मध्ये भाग घेतला आहे. त्यांनी १०० किमी, २०० किमी, ३०० किमी, ४०० किमी आणि ६०० किमी अशा ब्रेवेट्स पूर्ण केल्याने त्यांना सुपर रँडोनर हा किताब बहाल करण्यात आला आहे. ब्रेवेट्स या ऑडक्स इंडिया रेंडोनरतर्फे घेतल्या जाणाऱ्या २००, ३००, ४००, ६००, १००० आणि १२०० किमीच्या सायकलिंग स्पर्धा आहेत. भारतातील सर्व ब्रेवेट्स डे रँडोनर्स माँडिऑक्स आणि ऑडेक्स स्पर्धांचे आयोजन o कार्यचलन यासाठी ऑडक्स क्लब पारिसीयन यांची त्यांना मान्यता मिळाली आहे.एका कॅलेंडर वर्षात चार ब्रॅवेट्स पूर्ण करणाऱ्या खेळाडूला सुपर रँडोनर हा किताब बहाल केला जातो.

डॉ. स्वरुप पुराणिक यांच्याबद्दल

डॉ. स्वरुप यांनी आयआयएम कलकत्ता येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमधून त्यांनी बीडीएस पदवी आणि पेरीओडोंटिक्स अॅण्ड ओरल इम्प्लांटोलॉजीमध्ये एमडीएस केले आहे. क्लिनिकल रीसर्च, क्लिनिकल/मेडिलक लॅबोरेटरीमध्ये त्यांनी पदव्युत्तर डिप्लोमा केला आहे आणि मेडिको लीगल सिस्टम्समध्ये पदव्युत्तर डिप्लोमा केला आहे. ते सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत आणि त्यांनी एचआयपीएएचे प्रमाणपत्र मिळवले आहे.

इतक्या विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवणाऱ्या व्यक्तीसाठी आयुष्य म्हणजे दरवेळेस एक नवे आव्हान घेणे. डॉ. स्वरुप यांच्या बकेटलिस्टमध्ये आता आयर्नमॅन चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्याचे स्वप्न आहे. खूप कमी जण या स्पर्धेत भाग घेतात. पण, त्यांना ठाऊक आहे की ही स्पर्धा जितकी शारिरीक आहे तितकीच मानसिकही... आणि ते नक्कीच यशावर लक्ष्य ठेऊन आहेत!


​ ​

संबंधित बातम्या