World Cup 2019 :फाफ डुप्लेसिसच्या मते, 'या' दोन संघात होईल फायनल!

वृत्तसंस्था
Sunday, 7 July 2019

फाफ डु प्लेसिस म्हणाला की, मला वाटतं की भारतीय संघ आमच्या विजयामुळे आनंदी असेल. त्यांचा पुढचा सामना न्यूझीलंडशी होईल जो संघ गेल्या तीन सामन्यात पराभूत झाला आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये 14 जुलैला अंतिम सामना होईल असेही डु प्लेसिसने सांगितलं आहे.

वर्ल्ड कप 2019 :
मँचेस्टर : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर म्हटले की, आम्ही आनंदी असून आमच्यापेक्षा भारतीय संघ अधिक खूश असेल. त्यांना आता सेमीफायनलमध्ये बलाढ्य अशा यजमान इंग्लंडविरुद्ध लढावे लागणार नाही. फाफ डु प्लेसिस म्हणाला की, मला वाटतं की भारतीय संघ आमच्या विजयामुळे आनंदी असेल. त्यांचा पुढचा सामना न्यूझीलंडशी होईल जो संघ गेल्या तीन सामन्यात पराभूत झाला आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये 14 जुलैला अंतिम सामना होईल असेही डु प्लेसिसने सांगितलं आहे.

वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन्ही संघ बलाढ्य आहेत. यामुळे मी या दोन्ही संघापैकी एकाचे समर्थन करेन असेही फाफ डुप्लेसिसने सांगितलं आहे. दरम्यान, शेवटच्या साखळी सामन्यात भारताने लंकेला पराभूत करून गुणतक्त्यात पहिले स्थान पटकावले. तर ऑस्ट्रेलियाला आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने त्यांना दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. यामुळे आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंड़शी तर ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

फाफ डुप्लेसिच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. त्याशिवाय रेसी वेन डेर डुसेननं 95 तर क्विंटन डीकॉकनं 52 धावा केल्या. याच्या जोरावर आफ्रिकेनं 325 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाला वॉर्नरच्या दमदार शतकानंतरही 10 धावांनी पराभव पत्करावा लागला.


​ ​

संबंधित बातम्या