IND vs ENG: स्टोक्स आउट झाल्यावर पांड्याने सहकाऱ्यांची मागितली माफी
हार्दिक पांड्याने मैदानात केलेल्या कृत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
India vs England 3rd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात स्फोटक आणि घातक फलंदाज बेन स्टोक्स (Ben Stokes) 39 चेंडूत 35 धावा करुन बाद झाला. टी नटराजन याने स्टोक्सची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. ज्यावेळी स्टोक्स बाद झाला त्यावेळी हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) मैदानात साष्टांग नमस्कार करत सहकांऱ्याची माफी मागितल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पांड्याने मैदानात केलेल्या कृत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
स्टोक्स बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने हात जोडण्यामागेही एक कारण आहे. ज्यावेळी स्टोक्स 15 धावांवर खेळत होता त्यावेली हार्दिक पांड्याने त्याचा सोपा झेल सोडला होता. हा झेल टीम इंडियाच्या अडचणी वाढवणारा ठरु शकला असता पण स्टोक्स त्यानंतर 20 धावांची भर घालून माघारी फिरला. त्यामुळे हार्दिक पांड्याने सुटकेचा निश्वास टाकला. हार्दिक पांड्याने कॅच सोडल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीप्रमाणेच टीम इंडियाच्या ताफ्यात सर्वांच आश्चर्य वाटले होते.
धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटनंतर सातासमुद्रापलिकडे फेमस होतोय पंतचा 'स्कूप शॉट' (VIDEO)
Hardik after stokes catch was taken by Dhawan pic.twitter.com/0kTkicIfbh
— సన్రైజర్స్ అభిమాని (@SRHcultfan) March 28, 2021
हार्दिक पांड्या इतका सोपा झेल कसा सोडू शकतो, ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. त्यामुळे टी नटराजनच्या षटकात बेन स्टोक्स बाद झाल्यावर हार्दिक पांड्याने आपल्या सहकाऱ्यांची हात जोडून माफी मागितल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पांड्याने मैदानात हात जोडल्यानंतर रोहित आणि कोहलीने मजेशीर अंदाजात त्याची पाठ थोपटल्याचेही पाहायला मिळाले. बेन स्टोक्स टी नटराजनच्या फुलटॉस चेंडूवर शिखर धवनच्या हाती झेल देऊन माघारी परतला.