कोरोनाची दहशत...युरोपियन फुटबॉल लिग एक वर्ष पुढे ढकली 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 March 2020

जगभरात कोरोना व्हायरसची दहशत वाढत असून त्याचा परिणाम विविध क्रीडा स्पर्धांना देखील पडलेला आहे,. त्यात "यूएफा' ची वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तातडीची बैठक मंगळवारी होवून युरो-2020 ही फुटबाल लिग स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलण्याबाबत 55 देशाच्या संलग्न पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तातडीने आपतकाली बैठक झाली.

जून-जुलैमध्ये होणारी युरो चषक फुटबॉल स्पर्धा कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे 2021 पर्यंत पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी युरोपियन फुटबॉल संघटनेने (युएफा) घेतला आहे. त्यामुळे युरो 2020 ही स्पर्धा आता 11 जून ते 11 जुलै 2021 या कालावधीत घेण्याचा प्रस्ताव "यूएफा' ने केला आहे. 

जगभरात कोरोना व्हायरसची दहशत वाढत असून त्याचा परिणाम विविध क्रीडा स्पर्धांना देखील पडलेला आहे,. त्यात "यूएफा' ची वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तातडीची बैठक मंगळवारी होवून युरो-2020 ही फुटबाल लिग स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलण्याबाबत 55 देशाच्या संलग्न पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तातडीने आपतकाली बैठक झाली. त्यानंतर स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय "यूएफा' च्या कार्यकारी समितीने घेतली अशी माहित स्वीडन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कार्ल-एरिक निल्सॉन यांनी दिली. त्यामुळे युरो स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच स्पर्धा पुढे ढकलण्याची वेळ कोरोनामुळे आली. 

12 देशात होणार होता युरो चषक 
युरो चषक स्पर्धा यंदा प्रथमच एका देशात न घेता विविध देशातील 12 शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेची उपांत्य व अंतिम सामना ही मात्र लंडनमध्ये होणार होती. त्यामुळे स्पर्धा एक वर्ष पुढे ढकल्याने आता स्पर्धेच्या कार्यक्रमात अजून पुढे कोणते बदल होतील याची क्रीडा प्रेमीमध्ये औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

कोपा अमेरिकन स्पर्धा देखील पुढे ढकली 
कोपा अमेरिकन स्पर्धा ही अर्जेटिन आणि कोलंबिया येथे जूनमध्ये 12 जून ते 12 जुलै दरम्यान या दोन देशात प्रथम होणार होती. मात्र कोरोनामुळे इतर स्पर्धे प्रमाणे ही स्पर्धा देखील एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे.


​ ​

संबंधित बातम्या