माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ; सचिनने खास फ्रेममधून व्यक्त केलं प्रेम

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 8 March 2021

सचिनने बहिण सविता तेंडुलकर यांचाही ओवाळणी करतानाचा फोटो शेअर केल्याचे दिसत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने काही खास फोटो कोलेज करुन शेअर केले आहेत. यात त्याची आई रजनी तेंडुलकर यांचाही एक फोटो दिसतोय. तो या फोटोत आपल्या आईच्या हातात 'सचिन तेंडुलकर प्लेइंग इट माय वे'  हे आपल्या आयुष्यावर आधारित पुस्तक देताना दिसते.   

सचिनने बहिण सविता तेंडुलकर यांचाही ओवाळणी करतानाचा फोटो शेअर केला आहे. याशिवाय पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्यावरही त्याने प्रेम व्यक्त केले आहे. माझ्या आयुष्यातील आधारस्तंभ या कॅप्शनसह सचिन तेंडुलकरने जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! दिल्या आहेत. 

सध्याच्या घडीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजसाठी रायपूरमध्ये आहे. इंडिया लिजेंड संघाचे तो नेतृत्व करताना दिसत आहे. रस्ते अपघातासंदर्भात जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत अनेक दिग्गज सहभागी आहेत. सचिन तेंडुकरच्या नेतृत्वाखाली इंडिया लिजेंड संघाने आतापर्यंत स्पर्धेत सर्वच्या सर्व म्हणजेच आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात एकतर्फी विजय नोंदवला आहे. 5 मार्च रोजी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि सेहवागने नाबाद राहत संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. 


​ ​

संबंधित बातम्या