IPL2021 : पृथ्वीचं 'फ्लॉप टू हिट शो' परिभ्रमण    

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 11 April 2021

आयपीएलच्या मागील हंगामात खराब फॉर्ममुळे पृथ्वी शॉने  दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानही गमावले होते.

दिल्लीच्या ताफ्यातून खेळणाऱ्या मुंबईकराने आपल्या भात्यातील फटकेबाजीचा हिट शो दाखवून छोटा पॅक मोठा धमाका करण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले. युएईच्या मैदानात झालेल्या आयपीएल स्पर्धेत पृथ्वीला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. 13 सामन्यात त्याने 2 अर्धशतकाच्या मदतीने 228 धावा केल्या होत्या. युएईच्या मैदानात तो चांगलाच संघर्ष करताना दिसला. युएईतून त्याला टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाण्याचे तिकीट मिळाले. पण बॅट आणि पॅडमध्ये मैलाच अंतर ठेवून खेळणं त्याला चांगलच महागात पडलं. सातत्याने मिळालेल्या संधीनंतरही फ्लॉपशोमुळे त्याने टीम इंडियातील स्थान गमावले. 

आयपीएलच्या मागील हंगामात खराब फॉर्ममुळे पृथ्वी शॉने  दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानही गमावले होते. एवढेच नाही तर  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एडीलेड टेस्ट 0 आणि 4 धावांवर बाद झाल्यानंतर त्याला बाकावरच बसण्याची वेळ आली. बॅट-पॅडमधील अंतरामुळे होणारी टेक्निकली चूक दुरुस्त करुन तो यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी सज्ज झालाय.  

पराभवानंतर गोलंदाजांना खडसावलं, वाचा काय म्हणाला धोनी

युएईतील आयपीएलनंतर व्हाया ऑस्ट्रेलियात परतल्यावर त्याने आपल्या टेक्निकली चुकांवर काम करण्यास सुरुवात केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सल्ला ते प्रशिक्षक प्रविण आमरे यांच्यासोबत आपल्या बॅटिंगमध्ये होणाऱ्या चुका सुधारुण पृथ्वीनं क्रिकेटच्या मैदानातील परिभ्रमणाला सुरुवात केली. राष्ट्रीय पातळीवर फ्लॉपशोनंतर पुन्हा दिमाखदार कमबॅकसाठी क्रिकेटरला देशांतर्गत टुर्नांमेट खूप महत्त्वाची असते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रणजी स्पर्धा कॅन्सल झाली असली तरी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीने भारतीय क्रिकेटचे दरवाजे उघडले.

सामन्यानंतर पंत काय म्हणाला?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशजनक कामगिरीनंतर पृथ्वीने विजय हजारे स्पर्धा गाजवली. विजय हजारे ट्रॉफीत 165.40 च्या सरासरीने पृथ्वीनं 827 धावा कुटल्या. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट 138.29 एवढा होता. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने 38 चेंडूत 72 धावांची दमदार खेळी केली. दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पृथ्वीला स्वत:वर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करावे लागतील. तो या परीक्षेत पास झाला तर यंदाच्या हंगामात तो धावांची बरसात करुन पुन्हा टीम इंडियाचे दरवाजे नक्की ठोकावताना दिसू शकेल.


​ ​

संबंधित बातम्या