गब्बर-राहुलसाठी धोक्याची घंटा; T20 वर्ल्डकपसाठी ओपनिंगचा 'विराट' प्लॅन

सुशांत जाधव
Sunday, 21 March 2021

टी-20 मालिकेच्या सुरुवातीला विराट कोहलीने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे भारतीय टी-20 संघाचे प्रमुख ओपनर असल्याचे भाष्य केले होते.

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांची टी-20 मालिका आगामी वर्ल्ड कपची तयारी मानली गेली. आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये अव्वलस्थानी असलेल्या इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने कसोटीतील संघर्षानंतर टी-20 मध्ये आघाडीही घेतली. मात्र चौथ्या सामन्यात टीम इंडियाने आपले 'हारी बाजी को जितना हमे आता है...' तेवर दाखवत मालिकेत बरोबरी साधली एवढ्यावरच न थांबता टीम इंडियाने पाचवा आणि निर्णायक सामना नाणेफेक गमावल्यानंतही जिंकून दाखवत एक नंबरी इंग्लंडची हवा काढली. भारतीय संघाने अखेरच्या सामन्यात काही खास बदल केले. यात विराट कोहलीचा लाडला असलेल्या लोकेश राहुलला अखेर बाकावर बसवण्यात आले. मागील काही सामन्यातील सातत्याने फ्लोपशोची केएल राहुलला मोठी किंमत मोजावी लागली. ही कहाणी आता एवढ्यावरच थांबणार नाही. अखेरच्या सामन्यातील झलक वर्ल्डकपमध्येही दिसणार असल्याचे संकेत विराट कोहलीने दिले आहेत. याचा अर्थ भारतीय संघाच्या डावाची सुरुवात इथून पुढे कॅप्टन उप-कॅप्टन मिळून करणार आहेत. 

INDvsENG : बदलाच्या प्रयोगात विराट-रोहित जोडी ठरली हिट

टी-20 मालिकेच्या सुरुवातीला विराट कोहलीने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे भारतीय टी-20 संघाचे प्रमुख ओपनर असल्याचे भाष्य केले होते. अनुभवी आणि कामगिरीत सातत्याचा अभाव असलेल्या शिखर धवनला त्याने पर्यायी ओपनच्या यादीत टाकले होते. मात्र मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात रोहितला बाहेर बसवून शिखर धवन आणि त्यानंतर ईशान किशनचा प्रयोग सलामीला करण्यात आला. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना संधीचं सोनं करण्यात अपयश आले. दुसरीकडे युवा ईशान किशनने पदार्पणात अर्धशतकी खेळी करुन आपल्यातील क्षमता दाखवून दिली. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुर्यकुमार यादवही  संधी द्या सोन करुन दाखवतो, या मूडमध्ये दिसतोय. त्याला दोन सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्यात आलीय. इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं ओपनिंगसंदर्भात मोठे विधान केले आहे. 

INDvsENG : भुवीनं बटलरला त्रस्त करुन केल फस्त; हाच तर मॅचचा टर्निंग पाँइंट

टी-20 वर्ल्ड कपपर्यंत रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याचा प्लॅन राहिल, असे कोहलीने सांगितले. सध्याच्या घडीला मध्यफळीतील खेळाडू चांगली कामगिरी करत  आहेत.  रोहितसोबत जोडी जमवून त्यांच्यावरील दबाव आणखी कमी करण्याचा प्रयत्न राहिलं, असा मानस कॅप्टन कोहलीने बोलून दाखवलाय. त्यामुळे पर्यायी सलामीवीर शिखर धवनचे टेन्शन निश्चितच वाढणार आहे. दुसरीकडे लोकेश राहुलला युवा खेळाडू टक्कर देताना पाहायला मिळणार आहे. श्रेयस अय्यरने आपल्याला कोणत्याही स्थानावर पाटवा मी माझी जबाबदारी सक्षमपणे पार पाडेन, असा तोरा दाखवला आहे. सुर्युकमार आणि ईशान किशन संघातील आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असतील. त्यांनी सुरुवात निश्चितच चांगली केली आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माने डावाला सुरुवात केली आणि ही जोडी हिट ठरली तर आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत विराट दुष्काची मालिका निश्चितच संपुष्टात येईल.  
 


​ ​

संबंधित बातम्या