Schoolympics 2019 : ऑर्बिस स्कूल, सेस गुरुकुलची आगेकूच 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

पुणे : स्कूलिंपिक्‍स फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या विभागात ऑर्बिस, तर मुलींच्या विभागातून सेस गुरुकुल प्रशाला संघांनी आपली आगेकूच कायम राखली. दोन्ही संघांनी मंगळवारी आपापले सामने सहज जिंकले. 

पुणे : स्कूलिंपिक्‍स फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या विभागात ऑर्बिस, तर मुलींच्या विभागातून सेस गुरुकुल प्रशाला संघांनी आपली आगेकूच कायम राखली. दोन्ही संघांनी मंगळवारी आपापले सामने सहज जिंकले. 
आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ऑर्बिस स्कूल संघाने अक्षित क्षीरसागरच्या दोन गोलच्या जोरावर कोंढव्याच्या सिंहगड सिटी संघाचा 3-0 असा पराभव केला. धीर जोरी याने तिसरा गोल केला. मुलींच्या विभागात सीएम इंटरनॅशनल प्रशालेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात गुरुकुल संघाने सलग दुसऱ्या सामन्यात मोठा विजय मिळविला. रमा देशमुख आणि दृष्टी पाटील यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर त्यांनी एंजल इंग्लिश माध्यम प्रशाला संघाचा 5-0 असा पराभव केला. 

निकाल - सीएम इंटरनॅशनल स्कूल मैदान 
मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर 1 (वैष्णवी बराटे 30वे मिनिट) वि.वि. श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगाव 0; सेस गुरुकुल, विद्यापीठ रस्ता 5 (रमा देशमुख 7, 29 वे, दृष्टी पाटील 12, 15वे, जुई दीक्षित 15वे मिनिट) वि.वि. एंजल इंग्लिश माध्यम स्कूल, संभाजीनगर 0; इनोव्हेरा स्कूल, लोणी काळभोर 3 (निशा काळभोर 5, 23वे, साई कदम 9वे मिनिट) वि.वि. सेंट ऍन्स प्रशाला, कॅम्प 0; विद्याभवन प्रशाला, मॉडेल कॉलनी 4 (क्षितिजा निम्हण 2, 19वे, स्नेहा सांडभोर 13वे, अनिका प्रसाद 21वे मिनिट) वि.वि. सेंट हेलेनाज प्रशाला, कॅम्प 0; ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड 4 (नेहा भागवत 4थे, अहाना रामने 7वे, 14वे, शर्वाणी रिषी 20वे मिनिट) वि.वि. लोकसेवा इंग्लिश माध्यम स्कूल, फुलगाव 0; डॉ. कलमाडी प्रशाला, औंध 2 (श्रेया सुतार 5, 18वे मिनिट) वि.वि. कै. माधवराव सोनबा तुपे इंग्लिश माध्यम सेकंडरी स्कूल, हडपसर 1 (हबिबा इनामदार) 

मुले ः आगाशे महाविद्यालय मैदान 
नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल, फुलगाव 1 (शील शिलावंत 23वे मिनिट) वि.वि. एचडीएफसी स्कूल, मगरपट्टा 0; ऑर्बिस स्कूल, केशवनगर 3 (अक्षित क्षीरसागर 14, 29वे मिनिट, धीर जोरी 34वे मिनिट) वि.वि. सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा 0; आर्मी पब्लिक स्कूल, खडकी 4 (आर्यन पवार 4, 18वे., आर्यंश कटिया 22वे, तुषार मडकन्वर 37वे मिनिट) वि.वि. डॉ. कलमाडी श्‍यामराव प्रशाला, एरंडवणे 0. 
एनसीएल मैदान ः बोस्टन वर्ल्ड स्कूल, उंड्री 0, 3 (क्रिश गांगुली, रिषी गांगुली, मुफड्डल युसूफ) पेनल्टी शूट आउटमध्ये वि.वि. अरण्येश्‍वर इंग्लिश माध्यम स्कूल, सहकारनगर 0, 1 (साहिल साखरे); भारतीय विद्याभवन सुलोचन नातू विद्यामंदिर, सेनापती बापट रोड 7 (समर्थ जोशी 3रे, तरल मुनोत 4, 23, 32, सौरभ निकम 5, 19, अखिल मट्टापारथी 26वे मिनिट) वि.वि. रिम्स इंटरनॅशनल स्कूल, एनआयबीएम रोड, कोंढवा 0; श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगाव 4 (रिषित वाईकर 4, 25, 31, 39वे मिनिट) वि.वि. सरहद स्कूल, गुजर-निंबाळकरवाडी 0.


​ ​

संबंधित बातम्या