रेड कार्डमुळे ब्राझीलचा जिसस अंतिम सामन्यातही मुकणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 July 2021

चिलीविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत रेड कार्ड मिळालेला ब्राझीलचा स्ट्रायकर गॅब्रियल जिसस कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यासही मुकणार आहे. अर्जेंटिना विरुद्ध ब्राझील असा अंतिम सामना होणार आहे.

जिओ दि जिनेरो - चिलीविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत रेड कार्ड मिळालेला ब्राझीलचा स्ट्रायकर गॅब्रियल जिसस कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यासही मुकणार आहे. अर्जेंटिना विरुद्ध ब्राझील असा अंतिम सामना होणार आहे. दक्षिण अमेरिका फुटबॉल संघटनेने गॅब्रियल जिससवरील दोन सामन्यांच्या बंदीची पुष्टी केली. त्यामुळे तो सोमवारी झालेल्या सामन्यातही खेळू शकला नव्हता.

चिलीविरुद्धच्या सामन्यात जिससने इजिनियो मेना याच्या डोक्यावर कीक मारली होती. तो अपघात होता. जाणीवपूर्वक आपण हे कृत्य केले नव्हते; तरीही आपण त्याची दिलगिरी व्यक्त करत आहोत, असे जिससने सांगितले. दक्षिण अमेरिका फुटबॉल संघटनेने जिससला पाच हजार डॉलरचा दंडही केला. या निर्णयाविरुद्ध ब्राझीलने अपील न करण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वीच्या कोपा स्पर्धेत पेरूविरुद्धच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने ३-१ असा विजय मिळवला होता. त्या सामन्यात जिससने गोल केला होता. टिटे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझीलचा संघ तयार होत आहे. त्यांच्या कारकि‍र्दीत दोन रेड कार्ड मिळालेला जिसस हा एकमेव खेळाडू आहे.


​ ​

संबंधित बातम्या