कोणत्याही कारवाईविना डर्टी डझनसह चॅम्पियन्स लीग होणार

पीटीआय
Friday, 23 April 2021

सुपर लीगची संकल्पना मांडणाऱ्या तीन आघाडीच्या क्लबना चॅम्पियन्स लीगमधून बाद करण्याची योजना युरोपीय महासंघ तूर्तास स्थगित ठेवण्याचीच चिन्हे आहेत.

पॅरिस - सुपर लीगची संकल्पना मांडणाऱ्या तीन आघाडीच्या क्लबना चॅम्पियन्स लीगमधून बाद करण्याची योजना युरोपीय महासंघ तूर्तास स्थगित ठेवण्याचीच चिन्हे आहेत. रेयाल माद्रिद, चेल्सी तसेच मँचेस्टर सिटी यांना आगामी प्रीमियर लीगची उपांत्य लढत खेळण्यास मंजुरी मिळणार अशीच चिन्हे आहेत.

चॅम्पियन्स लीगला आव्हान दिलेल्या सुपर लीगच्या संकल्पनेत रेयाल, चेल्सी आणि सिटीचा मोलाचा सहभाग होता. सुपर लीगची संकल्पना आणलेले खोटारडे आणि साप आहेत, असे युरोपीय फुटबॉल संघाने म्हटले होते. या १२ क्लबना तातडीने चॅम्पियन्स तसेच युरोपा लीगमधून बडतर्फ करण्याची सूचनाही करण्यात आली होती. यामुळे युनायटेड आणि आर्सेनल युरोपा लीगमधून बाद होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

प्रीमियर लीग तसेच अन्य लीगमधील आघाडीच्या संघांनी सुपर लीगमधून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यावर युरोपीय महासंघही नम्र झाला आहे. त्यांनी चॅम्पियन्स तसेच युरोपा लीगमधील लढतीत बंडखोर क्लब असतील असे संकेत दिले आहेत.

सर्व काही पैशांसाठी
चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीतील चार संघांपैकी तीन संघ बंडखोरांपैकी आहेत. त्यांना बाद केल्यास राहणारा एकमेव संघ पीएसजी विजेता जाहीर करावा लागेल. या परिस्थितीत उपांत्य फेरीच्या चार आणि अंतिम फेरीची एक अशा पाच लढतींसाठी दूरचित्रवाणी कंपनीकडून मिळणाऱ्या रकमेवर पाणी सोडणे भाग पडेल.


​ ​

संबंधित बातम्या