Fifa World Cup Qualifiers : 'वार' नसल्यानं रोनाल्डोचा गोल नाकारला; वर्ल्डकप पात्रतेसाठी पोर्तुगालसमोर संकट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 March 2021

‘वार’ नसल्याचा फटका पोर्तुगालचे शेजारी असलेल्या स्पेनलाही बसला. गोलक्षेत्रात स्पेन बचावपटूकडून फाऊल झाल्याचे सांगत रेफरींनी ग्रीसला पेनल्टी किक दिली.

पॅरिस :  कोरोना महामारीमुळे पूर्ण क्षमतेने फुटबॉल स्पर्धा घेण्यात अडचणी येत आहेत आणि त्याचा फटका ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघास विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत बसला. रोनाल्डोने सर्बियाविरुद्धच्या लढतीत भरपाई वेळेत केलेल्या आक्रमणावर चेंडूने गोलरेषा पार केली होती, पण रेफरींनी गोल देण्यास नकार दिला. लढतीच्या वेळी गोललाईन तंत्रज्ञान तसेच व्हिडीओ असिस्टंट रेफरी (वार) नसल्यामुळे पोर्तुगालला बरोबरीवर समाधान मानावे लागले. गोल नाकारला गेल्यामुळे संतापलेल्या रोनाल्डोने त्याचा कर्णधाराचा बॅज मैदानात फेकून दिला. पोर्तुगालने सामन्याचा व्हिडीओ रिव्ह्यू घेण्यासाठी दाद मागितली आहे; मात्र सध्या तरी चार गुण असल्यामुळे पोर्तुगालचा विश्‍वकरंडक पात्रतेचा मार्ग खडतर झाला आहे. पोर्तुगालला या सामन्यात विश्रांतीच्या 2-0 आघाडीनंतर बरोबरी स्वीकारावी लागली.

तीन वर्षांपूर्वी रोनाल्डो प्रथमच युव्हेंटिसकडून चॅम्पियन्स लीग खेळत असताना त्याने प्रतिस्पर्ध्याचे केस खेचल्याचा निर्णय रेफरींनी दिला. त्या वेळी व्हिडीओ असिस्टंट रेफरी अर्थात वारची सुविधा नव्हती. युव्हेंटिसने दाद मागितल्यावर युरोपीय महासंघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत वार सक्तीचे करण्याचे ठरवले. आता कोरोनाचा प्रश्‍न असूनही लढतीच्या वेळी गोललाईन तंत्रज्ञान तसेच व्हिडीओ असिस्टंट रेफरी (वार) नसल्यामुळे पोर्तुगालला बरोबरीवर समाधान मानावे लागले.  चॅम्पियन्स तसेच युरोपा लीगच्या बाद फेरीत वारचा वापर होत आहे, पण विश्‍वकरंडक पात्रता लढतीत याचा अभाव आहे.दोन वर्षांपूर्वी विश्‍वकरंडक पात्रता लढतीत वारचा वापर करण्याचे ठरले होते, पण कोरोनामुळे याची अंमलबजावणी लांबणीवर टाकणे भाग पडले आहे. 

'पंतशिवाय भारतीय संघाची कल्पनाही करु शकत नाही"

‘वार’ नसल्याचा फटका पोर्तुगालचे शेजारी असलेल्या स्पेनलाही बसला. गोलक्षेत्रात स्पेन बचावपटूकडून फाऊल झाल्याचे सांगत रेफरींनी ग्रीसला पेनल्टी किक दिली. दूरचित्रवाणी रिप्लेत स्पेन बचावपटूचा फाऊल गंभीर नसल्याचे दिसले. याबाबत वाद होऊ शकतील, पण रोनाल्डोने भरपाई वेळेत गोल केल्याचे दूरचित्रवाणी प्रक्षेपणात दिसले होते. अर्थात, कोरोनामुळे वारचा वापर करणे सक्तीचे नसेल, असे जागतिक महासंघाने युरोपीय महासंघास कळवले होते.
 


​ ​

संबंधित बातम्या