स्पॅनिश आर्मडास युरो फुटबॉल स्पर्धेत स्वीडनचा बचाव भेदण्यात अपयश

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 June 2021

टीका-टाका अर्थात छोटे पास करून प्रतिस्पर्ध्यांचा बचाव पोखरणाऱ्या स्पॅनिश आर्मडास युरो फुटबॉल स्पर्धेत स्वीडनचा बचाव भेदण्यात अपयश आले. चेंडूवर ८५ टक्के वर्चस्व गाजवल्यावरही त्याचे गोलात रूपांतर करण्यात स्पेन अपयशी ठरले. हा सामना गोलशुन्य बरोबरीत सुटला.

सेविला (स्पेन) - टीका-टाका अर्थात छोटे पास करून प्रतिस्पर्ध्यांचा बचाव पोखरणाऱ्या स्पॅनिश आर्मडास युरो फुटबॉल स्पर्धेत स्वीडनचा बचाव भेदण्यात अपयश आले. चेंडूवर ८५ टक्के वर्चस्व गाजवल्यावरही त्याचे गोलात रूपांतर करण्यात स्पेन अपयशी ठरले. हा सामना गोलशुन्य बरोबरीत सुटला.

स्विडन गोलरक्षक रॉबिन ऑल्सन याने प्रतिकूल परिस्थितीत स्पेनला गोलपासून रोखले आणि त्यापासून प्रेरणा घेत स्वीडन बचावपटूंनी गोलक्षेत्रात खेळ उंचावला. त्यामुळे संधी असतानाही स्पेन आक्रमकांना त्या साधत्या आल्या नाहीत.

सामन्याच्या अंतिम टप्प्यात अल्वारो मोराता याने फारशी संधी नसतानाही एकाही स्वीडीश बचावपटूचे लक्ष नसलेल्या दानिएल्सनकडे चेंडू पास केला, पण दानिएल्सन चेंडूला दिशा देऊ शकला नाही. त्यापूर्वी ओल्माचा हेडर गोलरक्षकाने गोलरेषेवर थोपवत दडपण वाढवले होते. स्पेनच्या जवळपास प्रत्येक आक्रमक तसेच मध्यरक्षकाने गोलचा प्रयत्न केला, पण अंतिम हल्ला करण्यात प्रत्येक जण कमी पडला.

अशी झाली लढत
तपशील                    स्पेन         स्वीडन

चेंडूवरील वर्चस्व          ८५%          १५%
यशस्वी पास               ८५२            १०३
शॉटस्                         १७             ४
ऑन टार्गेट                    ५              १
कॉर्नर्स                         ६               १
फाऊल्स                      ७              ११


​ ​

संबंधित बातम्या