मॉद्रिक मॅजिकमुळे क्रोएशियाचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 June 2021

विश्वकरंडक उपविजेत्या क्रोएशियाने आपली गाडी गिअरमध्ये आणताना स्कॉटलंडचा ३-१ असा पाडाव केला आणि आपली ताकद दाखवत बाद फेरी गाठली.

ग्लास्गो - विश्वकरंडक उपविजेत्या क्रोएशियाने आपली गाडी गिअरमध्ये आणताना स्कॉटलंडचा ३-१ असा पाडाव केला आणि आपली ताकद दाखवत बाद फेरी गाठली. सहकाऱ्यांना सातत्याने सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित करणाऱ्या ल्युका मॉद्रिकने क्रोएशियाचा गोल करताना संघाचे उच्च कौशल्य दाखवून दिले. 

स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात निष्प्रभ ठरलेल्या क्रोएशियाने अखेरच्या साखळी लढतीत जणू कात टाकली. त्यांनी गुणतक्त्यात चेक प्रजासत्ताकला मागे टाकण्याची कामगिरीही केली. पहिल्या दोन सामन्यानंतर चाहत्यांनी, तसेच क्रोएशियातील माध्यमांनी संघास लक्ष्य केले होते. त्यास संघाने आपल्या कामगिरीने उत्तर दिले. मॉद्रिकने संघाचा दुसरा गोल करताना त्यांच्या चाहत्यांची शान उंचावली. 

आम्ही आता मान उंचावून मैदान सोडले आहे. माझ्या गोलने संघाचा दबदबा वाढला असेल तर चांगलेच आहे, असे मॉद्रिक म्हणाला. कोरोनाबाधित बिलि गिल्मॉरच्या अनुपस्थितीत स्कॉटलंडची मधली फळी कमकुवत झाली. त्याच्या मर्यादा क्रोएशियाने अधोरेखित केल्या. स्कॉटलंडच्या गोलचा आपल्यावर कोणताही परिणाम झालेला नाही हे क्रोएशियाने दाखवले. मॉद्रिकने वीस मीटरवरून गोल करीत क्रोएशियाची तयारी दाखवली. 

अशी झाली लढत
तपशील          क्रोएशिया    स्कॉटलंड 

चेंडू वर्चस्व           ६४%         ३६%
यशस्वी पासेस      ५९०           २५६
धाव (किमी)        १०४.७        १०७.९
शॉट                    ११              १२
ऑन टार्गेट            ७               ४
कॉर्नर्स                 ५               ७
फाऊल्स              १०              ८


​ ​

संबंधित बातम्या