इंग्लंडची सरशी, पण वर्चस्वाचा अभावच
इंग्लंडने युरो फुटबॉल स्पर्धेतील प्रभावी कामगिरी कायम ठेवताना चेक प्रजासत्ताकचा १-० असा पराभव केला. रहीम स्टर्लिंगच्या हेडरमुळे पुन्हा इंग्लंडने बाजी मारली; मात्र या विजयाने पुन्हा एकदा इंग्लंडसमोरील आव्हान आगामी लढतीत जास्त आव्हानात्मक असेल, याची जाणीवही त्यांच्या पाठीराख्यांना करून दिली.
लंडन - इंग्लंडने युरो फुटबॉल स्पर्धेतील प्रभावी कामगिरी कायम ठेवताना चेक प्रजासत्ताकचा १-० असा पराभव केला. रहीम स्टर्लिंगच्या हेडरमुळे पुन्हा इंग्लंडने बाजी मारली; मात्र या विजयाने पुन्हा एकदा इंग्लंडसमोरील आव्हान आगामी लढतीत जास्त आव्हानात्मक असेल, याची जाणीवही त्यांच्या पाठीराख्यांना करून दिली.
स्टर्लिंगने या स्पर्धेतील त्याचा तसेच इंग्लंडचा दुसरा गोल केला. बाराव्या मिनिटास स्टर्लिंगने केलेला गोल, त्याचबरोबर जॅक ग्रिलीश तसेच बुकायो साका यांची प्रभावी आक्रमणे यामुळे पूर्वार्धात इंग्लंडचा प्रभाव पडला; मात्र चेक प्रभावी ठरू लागल्यावर क्वचितच चाली दिसल्या आणि खेळ नीरस होत गेला. ग्रिलिशचे नाव जाहीर झाल्यावर चाहत्यांनी हुर्यो केली; पण त्यानेच पूर्वार्धात इंग्लंडच्या आक्रमणास वेग दिला.
अर्थात पराभवानंतरही बाद फेरी निश्चित असल्याने चेक संघाचीही काही तक्रार नव्हती. मात्र क्रोएशियाच्या विजयामुळे चेकला उपविजेतेपद जिंकता आले नाही.
इंग्लंडला गटात एकही हार पत्करावी लागली नाही. बाद फेरीची लढत घरच्या मैदानावरच होणार हे सुखावत असले, तरी संपूर्ण स्पर्धेत त्यांनी दोनच गोल केले आहेत. कोणत्याही गतविजेत्या संघापेक्षा हे कमी आहेत. विस्कळित आक्रमणे तसेच अतिसावधता इंग्लंडला त्रासदायक ठरू शकेल. त्याहीपेक्षा खेळाची सूत्रे असलेल्या मधल्या फळीच्या खेळात पुरेशी सफाई नाही. ‘आमच्या खेळात सफाई नसेल; पण नक्कीच चांगल्या संघाची झलक आमच्या खेळात दिसली,’ असे इंग्लंडचे मार्गदर्शक गेराथ साऊथगेट यांनी सांगितले. आम्हाला सेट प्लेवर अद्याप गोल करता आलेले नाहीत, हे नक्कीच चिंतेची बाब आहे, असेही ते म्हणाले.
अशी झाली लढत
तपशील चेक इंग्लंड
चेंडूवर वर्चस्व ४३% ५७%
यशस्वी पास ३३९ ४५४
धाव (किमी) ११४.९ १०८.५
शॉटस्् ७ ५
ऑन टार्गेट १ २
कॉर्नर्स ४ ६
फाऊल्स १० ११