बदली खेळाडूने जर्मनीस तारले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 June 2021

युरो फुटबॉल स्पर्धेतील हंगेरीविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीत बाद फेरी निश्चित करणारा गुण मिळवण्यासाठी जोशीम लोव सातत्याने बदली खेळाडूंसाठी आग्रही होते.

म्युनिच - युरो फुटबॉल स्पर्धेतील हंगेरीविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीत बाद फेरी निश्चित करणारा गुण मिळवण्यासाठी जोशीम लोव सातत्याने बदली खेळाडूंसाठी आग्रही होते. बदली खेळाडू लिऑन गॉरेत्झका याने सहा मिनिटे असताना गोल करीत जर्मनीची हार टाळली, तसेच गटउपविजेतेपदासह संघाला बाद फेरीत प्रवेश मिळवून दिला.

विश्वकरंडक स्पर्धेप्रमाणेच जर्मनीला साखळीत बाद व्हावे लागेल अशी शक्यता दिसत होती, पण सामन्यातील ८३ व्या मिनिटापर्यंत गटात चौथे असलेले जर्मनी गॉरेत्झकाच्या गोलमुळे थेट गटउपविजेते झाले. आम्ही चुका केल्या पण हार मानली नाही. आम्ही अखेरपर्यंत लढलो. हे कमकुवत मन असलेल्यांना जमत नाही. गट अवघड होता, तरीही खच्ची झालो नाही. आम्ही बाद फेरी गाठली आहे, ते महत्त्वाचे आहे, असे लोव यांनी सांगितले.

हंगेरीतील एलजीबीटीक्यू कायद्याच्या विरोधात जर्मनी एक झाली आहे. जर्मनी-हंगेरी लढतीच्या वेळी त्याचे पडसाद उमटत होते. या परिस्थितीत हंगेरीविरुद्धच्या पराभवाने जर्मनी बाद झाले असते तर संघावर जास्त टीका झाली असती. 


​ ​

संबंधित बातम्या