सोशल मीडियावरही मेस्सी रोनाल्डोपेक्षा भारी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 August 2021

फुटबॉलच्या मैदानावर लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात श्रेष्ठ कोण? या दोघांमधली ही लढाई कधीच संपणारी नाही. आता तर मैदानाबाहेर म्हणजेच सोशल मीडियावर यांच्या पाठीराख्यांमधले द्वंद्व कमालीचे रंगत आहे, पण मेस्सीने पोस्ट केलेल्या तीन छायाचित्रांनी रोनाल्डोवर कडी केली आहे.

पॅरिस - फुटबॉलच्या मैदानावर लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात श्रेष्ठ कोण? या दोघांमधली ही लढाई कधीच संपणारी नाही. आता तर मैदानाबाहेर म्हणजेच सोशल मीडियावर यांच्या पाठीराख्यांमधले द्वंद्व कमालीचे रंगत आहे, पण मेस्सीने पोस्ट केलेल्या तीन छायाचित्रांनी रोनाल्डोवर कडी केली आहे.

रोनाल्डो आणि मेस्सी यांच्या वर्चस्वाची ही इंस्टाग्रामवरच लढाई आहे. सुरुवातीपासून इंस्टाग्राम वापरणाऱ्या रोनाल्डोचे ३२ कोटी ९० लाख फॉओअर्स आहेत; तर आता आता इंस्टाग्रामवर सक्रिय झालेल्या मेस्सीचे २५ कोटी दोन लाख फॉलोअर्स आहेत. गेल्या महिनाभरात मेस्सीने तीन छायाचित्रे पोस्ट केली आणि या तिन्ही छायाचित्रांना क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक लाईक्सचा विक्रम केला.

सर्वाधिक लाईक्सची छायाचित्रे
1 पहिले छायाचित्र आहे ब्राझीलला हरवून कोपा अमेरिका करंडक जिंकल्याचा. त्याला दोन कोटी १८ लाख लाईक्स. अर्जेंटिनासाठी त्याने मिळवलेले हे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय यश आहे.
2 दुसरे छायाचित्र आहे बार्सिलोनातून पीएसजी क्लबमध्ये गेल्यावर तेथे त्याचा जर्सीच्या अनावरणाचा त्यावर दोन कोटी १६ लाईक्सचा पाऊस पडला आहे.
3 तिसरे छायाचित्र मेस्सीने आतापर्यंत जिंकलेल्या सर्व वैयक्तिक आणि सांघिक करंडकांसोबतचे आहे. त्यालाही दोन कोटी नऊ लाखांचे लाईक्स आहेत आणि अजून त्यावर लाईक्स सुरू आहेत.

आतापर्यंत ख्रिस्तियानो रोनाल्डो आघाडीवर होता. त्याने फुटबॉल सम्राट दिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजली अर्पण करताना केलेल्या पोस्टला एक कोटी ९८ लाखांचे लाईक्स मिळाले होते. आता मेस्सीने हा विक्रम मोडला आहे.

मेस्सी-रोनाल्डो कधी येणार आमने-सामने
रोनाल्डो रेयाल माद्रिद तर मेस्सी बार्सिलोनातून खेळत असताना ला लिगामध्ये या दोघांचा सामना होत होता, पण रोनाल्डो इटलीतील लीगमध्ये खेळत आहे; तर मेस्सी फ्रान्समधील लीगमध्ये खेळणार आहे, त्यामुळे ते एकमेकांसमोर येणार नाही. अपवाद चॅम्पियन्स लीगचा. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेचाही असू शकेल.


​ ​

संबंधित बातम्या