सर्व काही मेस्सीसाठी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 July 2021

कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम लढत संपल्याची शिट्टी वाजली आणि अर्जेंटिना संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ मेस्सीच्या दिशेने धावले. आणि त्यांनी त्याला तीनदा हवेत उडवत विजेतेपदाचा आनंद साजरा केला.

कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम लढत संपल्याची शिट्टी वाजली आणि अर्जेंटिना संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ मेस्सीच्या दिशेने धावले. आणि त्यांनी त्याला तीनदा हवेत उडवत विजेतेपदाचा आनंद साजरा केला. अखेर दहाव्या प्रमुख स्पर्धेत मेस्सीला जेतेपद जिंकता आले होते. त्याला या विजेतेपदामुळे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार गौण वाटत होता.

आनंद भरपूर झाला आहे. अर्जेंटिनास विजेतेपद जिंकून दिल्याचे स्वप्न अनेकदा पाहिले आहे. यंदा हा संघ जिंकू शकेल, हा विश्वास होता. गेल्या स्पर्धेतील अपयशानंतर आमची ताकद वाढली होती. आमच्या संघातील खेळाडू कायम संघाच्या हितासाठी तयार असतात, ते कसलीही तक्रार करीत नाहीत, असे मेस्सीने सांगितले.

या स्पर्धेतील खेळ पाहून मेस्सीचे चाहते वाढले असतील. त्याच्याविना काय हा विचारच करू शकत नाही. तो पूर्ण तंदुरुस्त नसला, तरी त्याचा विचार न करता संघासाठी सर्व काही सतत देत असतो, असे अर्जेंटिनाचे मार्गदर्शक लिओनेस शालोनी यांनी सांगितले. अंतिम सामन्यास खास सात हजार निमंत्रित होते. ते ब्राझीलचे कट्टर पाठीराखे होते. त्यामुळे मेस्सीकडे चेंडू आल्यावरही हुर्यो होत असे. अर्थात याची ना मेस्सीला फिकीर होती, ना अर्जेंटिना संघास. अर्जेंटिना संघाने जेतेपदाचा जल्लोष करताना मेस्सीला केंद्रस्थानी ठेवत या टीकाकारांना उत्तर दिले. मेस्सीला या यशामुळे आपण केवळ व्यावसायिक स्पर्धेतील स्टार नाही, हे सिद्ध केल्याचे जास्त समाधान असेल.

पूर्ण तंदुरुस्त नसतानाही मेस्सी उपांत्य तसेच अंतिम लढतीत खेळला. तो त्यावेळी मांडीच्या दुखापतीने बेजार होता, पण विजेतेपद जिंकण्यासाठी संघाला आपली गरज आहे, याची कल्पना असल्यामुळे त्याने खेळायचे ठरवले. 
- लिओनेल शालोनी, अर्जेंटिनाचे मार्गदर्शक.

मेस्सी विश्वकरंडक स्पर्धेत
स्पर्धा    सामने    विजय    पराभव    मिनिटे     गोल     कामगिरी

२००६     ३     २     ०     १२१     १     उपांत्यपूर्व फेरी
२०१०     ५     ४     १     ४५०     ०     उपांत्यपूर्व फेरी
२०१४     ७     ५     १     ६९३     ४     उपविजेते
२०१८     ४     १     २     ३६०     १     उपउपांत्यपूर्व फेरी
एकूण     १९     १२     ४     १६२४     ६     -

कोपा अमेरिका स्पर्धेत
स्पर्धा     सामने     विजय     पराभव     मिनिटे     गोल     कामगिरी

२००७     ६     ५     १     ४५६     २     उपविजेते
२०११     ४     १     ०     ३९०     ०     उपांत्यपूर्व फेरी
२०१५     ६     ३     ०     ५७०     १     उपविजेता
२०१६     ५     ४     ०     ३७४     ५     उपविजेते
२०१९     ६     ३     २     ४८७     १     उपांत्य फेरी
२०२१     ७     ५     ०     ६३०     ४     विजेते
एकूण     ३४     २१     ३     २,९०७     १३     -


​ ​

संबंधित बातम्या