FIFA World Cup qualification : बलाढ्य जर्मनीची लाजिरवाणी हार
या पराभवामुळे अखेरचे काही महिने मार्गदर्शक असलेल्या जोशीम लोव यांना मुदत संपण्यापूर्वीच हटवले जाईल अशी चर्चा आहे.
बर्लिन : चार वेळच्या जागतिक विजेत्या जर्मनीला विश्वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेत धक्कादायक हार पत्करावी लागली. नॉर्थ मॅसेडोनिया या फारशा प्रसिद्ध नसलेल्या देशाने जर्मनीला त्यांच्या देशात हरवले. जर्मनीला 20 वर्षांत प्रथमच पात्रता स्पर्धेतील लाजिरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले. या पराभवामुळे अखेरचे काही महिने मार्गदर्शक असलेल्या जोशीम लोव यांना मुदत संपण्यापूर्वीच हटवले जाईल अशी चर्चा आहे.
FIFA World Cup qualification : ख्रिस्तियानो रोनाल्डोने अखेर खाते उघडले
बचावावर पूर्ण लक्ष केंद्रित केलेल्या प्रतिस्पर्ध्यांना चकवू शकलो नाही. त्याहीपेक्षा त्यांचे प्रतिआक्रमणही रोखण्यात अपयश आले, असे लोव यंनी सांगितले. उत्तर मॅसोडेनियाने गोलच्या दोन्ही संधी साधल्या; तर आम्ही अनेक दवडल्या अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.
IPL मध्ये 7 वर्षानंतर चान्स मिळाल्यावर पुजाराने बदलला स्टान्स
जर्मनीची घसरण
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये 0- 6 हार, त्यापूर्वी 2018 च्या स्पर्धेत साखळीत बाद
विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील सलग 18 विजयांनंतर हार 2012 मध्ये घरच्या मैदानावर पात्रता स्पर्धेतील लढतीत स्पेनविरुद्ध 4-4 बरोबरी. त्यानंतरच्या सर्व सामन्यांत विजय पात्रता स्पर्धेतील 35 अपराजित सामन्यांनंतरची पहिली हार
यापूर्वीची हार 2001 मध्ये इंग्लंडविरुद्ध. त्या वेळी 1-4 पराभव या पराभवानंतर जर्मनीतील लढतीत दोन गोल करणारा उत्तर मॅसेडोनिया हा दुसरा संघ.